संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिसायला रुबाबदार, आवाजातही तोच दबदबा यामुळे युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या बुलेटला खान्देशकरांकडूनही पसंती देण्यात येत आह़े दस:याच्या मुहूर्तावर खान्देशातून सुमारे 270 बुलेटची बुकींग करण्यात आल्याची माहिती आह़े येत्या दोन ते तीन दिवसात यात अधिक वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आह़ेसाडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दस:याला अनेकांकडून नवीन वस्तूंची खरेदी करण्यात येत असत़े यात विविध वाहने, इलेक्ट्रॉनीक वस्तू, कपडे, सोने आदींचा समावेश असतो़ परंतु सध्याच्या युवक वर्गाकडून दुचाकी वाहनांमध्ये बुलेटला सर्वाधिक पसंती देण्यात येत आह़े मिळालेल्या माहितीनुसार जळगाव, धुळे व नंदुरबार येथील अधिकृत शोरुममध्ये दस:याच्या मुहूर्तावर अनुक्रम 90, 100 व 80 बुलेटची बुकींग झाली असल्याचे समजत़े त्यामुळे युवकांमध्ये बुलेटची क्रेझ अजूनही कायम आहे हेच यातून दिसून येत आह़े मागील वर्षाची तुलना केल्यास जळगाव जिल्ह्यात दस:याच्या मुहूर्तावर 70 बुलेटची विक्री झाली होती ती आता वाढून 90 वर आली आह़े त्याच प्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातून मागील वर्षी 35 बुलेटची विक्री झाली होती ती आता वाढून 80 झाली आह़े अशीच काहीशी स्थिती धुळ्याचीदेखील आहे गेल्या वर्षी सुमारे 35 बुलेटची विक्री करण्यात आली होती़ त्यात वाढ होऊन आता हा आकडा 100 झाला आह़े आपल्या रुबाबदार लुक व दमदार आवाजासाठी प्रसिध्द असलेल्या बुलेटला सर्वाधिक पसंती ही युवक वर्गाकडून देण्यात येत आह़े परंतु यात वयस्क वर्गही कुठे मागे आहे असे नाही़ नवीन दुचाकी घ्यायची म्हटली व थोडा खिसा खाली करण्याची तयारी असल्यास ग्राहकांकडून हमखास बुलेटचीच खरेदी करण्यात येत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आह़े शहरीभागांमध्ये बुलेटची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आह़े पूर्वीही बुलेट वापरणा:यांची संख्या मोठी होती़ या गाडय़ा सहज चालवता येत नसत आणि त्यांचे वजनही जास्त होत़े नंतर अनेक नवीन गाडय़ा आल्या परंतु बुलेटने आपली क्रेझ युवक वर्गामध्ये कायम ठेवली़ सध्या बुलेटमध्ये अनेक सुधारीत मॉडल ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत़ त्यामुळे ती सर्वाच्याच पसंती उतरताना दिसून येत आह़े ‘रपेट’साठी युवकांकडून मागणीबुलेटची सर्वाधिक पसंती युकांकडून देण्यात येत आह़े अनेक जण केवळ लाँग ड्राईव्ह तसेच रपेट मारण्यासाठीही बुलेटचा वापर करीत असल्याचे दिसून येत असत़े
खान्देशकर झाले बुलेटराजा
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: September 24, 2017 11:24 AM
270 बुलेटची बुकींग : ग्राहकांकडून साधला जातोय दस:याचा मुहूर्त
ठळक मुद्देबुलेटमुळे जपला जातोय ‘स्टेटस सिम्बॉल’ बुलेटची खरेदी करणार वर्ग हा मुख्यत्वेकरुन शहरी भागातील आह़े याची सर्वाधिक क्रेझ हे महाविद्यालयीन युवक वर्गामध्येही बघायला मिळत असल़े चित्रपट तसेच मेट्रोसिटीमध्ये असलेली बुटची क्रेेझ ही हळूहळू आता निमशहरी तसेच महानगरा