शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

एकाचवेळी चौघांवर अंत्यसंस्कार : गावाच्या हाकेच्या अंतरावरच काळाचा घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 1:17 PM

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : रात्रभर धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परत येत असतांना हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या तलावडी गावात पोहचण्याच्या आधीच पाच जणांवर काळाने अचानक घाला घातला. सकाळी-सकाळी घडलेली ही घटना तलावडी गावावर शोककळा पसरवून गेली. एकाच गावातील चौघांचा अकाली मृत्यू आणि 13 जणांना बसलेला गंभीर मार अंगावर शहारे आणणारा ठरला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : रात्रभर धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परत येत असतांना हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या तलावडी गावात पोहचण्याच्या आधीच पाच जणांवर काळाने अचानक घाला घातला. सकाळी-सकाळी घडलेली ही घटना तलावडी गावावर शोककळा पसरवून गेली. एकाच गावातील चौघांचा अकाली मृत्यू आणि 13 जणांना बसलेला गंभीर मार अंगावर शहारे आणणारा ठरला. दरम्यान, गावातील चारही मृतांवर सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  शहादा-म्हसावद रस्त्यावर आमोदा फाटय़ानजीक गुरुवारी सकाळी घडलेल्या अपघाताच्या घटनेत तलावडीतील चार जणांना आपला जीव गमवावा लागला. भल्या सकाळी घडलेल्या या घटनेमुळे म्हसावद पंचक्रोशी सुन्न झाली. दिवसभर याच घटनेची चर्चा परिसरात होती.तलावडी येथील 17 जण अॅपे रिक्षाने भोंगरा, ता.शहादा येथे इंदल कार्यक्रमानिमित्त बुधवारी रात्री गेले होते. त्यासाठी त्यांनी लक्कडकोट येथील रिक्षाचालक संजय रायमल रावताळे यांची रिक्षा भाडय़ाने केली होती. बुधवारी रात्री भोंगरा येथे पोहचल्यानंतर त्यांनी रात्रभर इंदल उत्सवात सहभाग घेतला. हा उत्सव अर्थात रात्रभर चालतो. पहाटे त्याचा समारोप केला जातो. पहाटे समारोप झाल्यानंतर तलावडीची सर्व मंडळी पुन्हा त्याच रिक्षाने आपल्या    गावाकडे सकाळी साडेपाच वाजता निघाली. सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांची रिक्षा आमोदा फाटय़ाजवळ आली असता समोरून येणा:या मालवाहू टेम्पोची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात अडकून चार जण जागीच ठार झाले होते. गाव हाकेच्या अंतरावरभोंगरा ते तलावडी हे अंतर साधारणत: 45 किलोमिटर आहे. त्यातील 42 ते 43 किलोमिटर अंतर त्यांनी सुखरूप पार पाडले. आमोदा गावापासून अर्थात अपघात स्थळापासून तलावडी अवघ्या दीड ते दोन किलोमिटर अंतरावर असतांना काळाचे अचानक घाला घातला.   घरी जाण्याची ओढ त्यांच्या     जिवावर बेतली आणि होत्याचे नव्हते झाले.गावावर शोककळागावात प्रथमच काळाचा अशा प्रकारे घाला झाला होता. प्रथमच एकाच वेळी चार जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे गावात शोककळा पसरली होती. जे जखमी झाले होते त्यांच्या चौकशीसाठी नातेवाईकांची धावपळ उडाली होती. गरीब कुटूंबातील सर्व असल्यामुळे त्यांना म्हसावद व शहादा येथे जाण्यासाठी देखील वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे जखमींच्या प्रकृतीची त्यांच्या कुटूंबियांना काळजी लागली होती.यांनी केले उपचारभल्या सकाळी अपघाताची माहिती होताच आमोदा, म्हसावद येथील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. म्हसावदचे सहायक पोलीस निरिक्षक राकेश चौधरी यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. जेसीबीच्या सहायाने मालवाहू ट्रक उचलून गाडीखाली दाबलेल्यांना बाहेर काढण्यात आले. तोरणमाळ, मंदाणा, म्हसावद, शहादा येथील रुग्णवाहिकांद्वारे मयत व जखमींना तातडीने म्हसावद ग्रामिण रुग्णालय व तेथून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. म्हसावद रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक अे.आर.शेख, डॉ.प्रल्हाद पवार, डॉ.भूषण पाटील, डॉ.सोनल भावसार, डॉ.श्याम ठाकुर, डॉ.अविनाश पाटील, डॉ.राजेश पाटील, डॉ.सचिन परदेशी, डॉ.रिमान पावरा यांच्यासह गावातील डॉ.रजनीकांत सूर्यवंशी, डॉ.अरुण लांडगे, डॉ.बलराज पावरा यांनी प्राथमिक उपचार केले. शहादा रुग्णालयात डॉ.गोविंद शेल्टे व त्यांच्या सहका:यांनी शवविच्छेदन केले.आरटीओंची पहाणीअपघातस्थळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, निरिक्षक पी.एम.सैंदाणे, ओमप्रकाश यांनी दुपारी भेट देवून पहाणी केली. या मार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकीवर लवकरच कारवाई करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिका:यांनी भेट दिली. म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.