ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि. 15 - शहादा येथे बुधवारी पालिका सभापती सद्दाम तेली यांच्या खुनानंतर उसळलेल्या दंगलीत जाळापोळ करण्यात आली होती़ जाळपोळ करून नुकसान करणा:या 300 दंगेखोरांवर गुरूवारी पहाटे शहादा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ शहादा पालिका बांधकाम सभापती सद्दाम सलीम तेली यांचा बुधवारी निघृण खून झाल्यानंतर गरीब नवाज कॉलनी येथील मुख्तार अहमद शेख, समीर मेकॅनिक, फरीद पठाण यांच्याघरात व घरासमोर आणि खेतिया रोड भागात मुन्ना ऊर्फ मेहमूद शेख अहेमद, सलीम व रफिक शेख यांच्या दुकाने पेटवली होती़ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी वारंवार समज देऊनही पोलीसांच्या दिशेने दगडफेक करून जखमी केल़े यात उपाविभागीय पोलीस अधिकारी एम़बी़पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक अमृत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश धात्रक हे जखमी झाले होत़े याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जगन्नाथ बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद, कासीब बेकरीवाला यांच्यासह 200 ते 300 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संशयित आरोपींची धरपकड करण्याचे सत्र गुरूवारी दिवसभर सुरू होत़े संशयित जमावाने मुख्तार शेख यांच्या घरातील दोन ते तीन लाखांची मालमत्ता आणि वाहने जाळल्याची माहिती देण्यात आली आह़े टँकरमधून पाणी वाटपावरून बुधवारी झालेल्या या वादातून सभापती सद्दाम तेली यांचा खून झाला होता. याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ सय्यद मुजफ्फर अली सय्यद लियाकत अली यांनी दिलेल्या फिर्यादीत मेहमूद शेख यांच्यासह सात जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल आह़े तर सय्यद नासिर अली लियाकत अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सद्दाम सलीम तेली व मुजफ्फर लियाकत अली यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी साजिद ऊर्फ प्रेम अहमद शेख याच्यासह आठ ते नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
जाळपोळ प्रकरणी शहाद्यात 300 जणांविरोधात गुन्हे
By admin | Published: June 15, 2017 5:05 PM