लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील हाटमोहिदे येथील माहेर व मध्यप्रदेशातील बेहडीया येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ सीमा राजेंद्र पटेल असे विवाहितेचे नाव आह़े त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती राजेंद्र प्रकाश पटेल याच्यासह सासरच्यांकडून 28 एप्रिल 2019 ते 7 जून 2019 यादरम्यान वेळावेळी हाटमोहिदे येथील माहेरुन पाच लाख रुपये आणावेत यासाठी छळ सुरु होता़ विवाहिता सिमा यांनी पैसे न आणल्याने त्यांना मानसिक त्रास देऊन वेळोवेळी मारहाण करण्यात येऊन धमकी देण्यात येत होती़ दरम्यान सासरच्यांच्या छळाला कंटाळून विवाहिता सीमा पटेल ह्या माहेरी आल्या होत्या़ शुक्रवारी त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती राजेंद्र, सासरे प्रकाश भगवान पटेल, सासू वंदना प्रकाश पटेल, चुलत सासरे संजय भगवान पटेल, योंगेंद्र जगन्नाथ पटेल, नणंद हेमा योगेंद्र पटेल, अरुण तुंबा पाटील, चुलत नणंद भारती अरुण पाटील, संजय ब्रिजलाल पाटील सर्व रा़ बेहडिया ता़ पानसेमल जि़ बडवानी, मध्यप्रदेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:22 PM