लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : म्हसावद ता़ शहादा येथील पोलीस ठाणे आवारात एकमेकांसोबत भांडून हाणामारी करणा:या चौघांवर पोलीसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला़ गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा घटना घडली़ किसन सखाराम पवार, पटल्या रुपा पवार दोन्ही रा़ विरपूर व सुकलाल जंगल्या पवार, मगन सुकलाल पवार दोन्ही रा़ नांदे ता़ शहादा यांच्या किरकोळ कारणातून वाद झाला होता़ यातून चौघांमध्ये हाणामारी होत होती़ दरम्यान म्हसावद पोलीस ठाण्यातही त्यांच्यात हाणामारी सुरु असल्याने पोलीसांनी अटकाव करत त्यांच्यावर कारवाई केली़ याप्रकरणी पोलीस नाईक भाऊसाहेब गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन किसन पवार, पटल्या पवार, सुकलाल पवार, मगन पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल पवार करत आहेत़
पोलीस ठाणे आवारात हाणामारी केल्याने गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:43 PM