लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तरुणीचा पाठलाग करून, तिला अलि एसएमएस करून विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवापूर येथील भोई गल्ली परिसरात राहणा:या तरुणीला त्याच भागातील तरुण नेहमीच तिचा पाठलाग करीत होता. मोबाईलद्वारे एसएमएस करून त्रास देणे सुरू होते. तरुणीच्या घरी जावून तरुणीला व तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीने फिर्याद दिल्याने तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक पाटील करीत आहे.
विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:53 AM