ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.28- शहरातील गिरीविहार भागात अॅनिमेशनचा क्लास सुरु करीत शिक्षण न देताच विद्याथ्र्याकडून पैसे उकळणा:या क्लासचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आह़े
गिरीविहार भागात 2012 च्या मार्च महिन्यात अॅनिमेशन अॅकडमी नावाच्या क्लासची सुरूवात करण्यात आली होती़ या ठिकाणी 2 डी अॅनिमेशन या कोर्सद्वारे व्यवसाय शिक्षण देण्यात येत असल्याची बतावणी करून विद्याथ्र्याकडून पैसे उकळण्यात आले होत़े काही दिवस सुरू असलेला क्लास अचानक बंद करण्यात आला़ याठिकाणी शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याकडून शासकीय शिष्यवृत्त्यांचे अर्ज भरून घेण्यात येऊन वारंवार शिकवणी फीची वसुली करण्यात आली होती़ या प्रकारानंतर संबधित विद्याथ्र्याना शिक्षण न देताच क्लासचे शिक्षक आणि संचालक यानी काढता पाय घेतल्याने या प्रकाराचे गांभिर्य वाढले होत़े अनेक विद्याथ्र्याकडून क्लासच्या शिक्षक आणि संचालकांकडे फी परत करण्याबाबत विचारणा सुरू होती़ संशयितांकडूनही शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे सांगून विद्याथ्र्याची बोळवण करण्यात येत होती़ मात्र पाच वर्षे उलटूनही विद्याथ्र्याना फी किंवा शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठून शुक्रवारी सायंकाळी या प्रकाराची वाच्यता केली आह़े
याबाबत लक्ष्मण सुक:या गवळी रा़ ठाणेपाडा ता़ नंदुरबार याने दिलेल्या फिर्यादीवरून अॅनिमा अॅनिमेशन अॅकडमी गिरीविहार गेट या क्लासचे संचालक, प्राचार्य आणि शिक्षक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े अपराहाराची रक्कम आणि संबधित संशयितांची नावे कळू शकलेली नाहीत़ या सर्व संशयितांचा पोलीस पथकाकडून शोध घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े