लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गोधनाची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक अक्कलकुवा पोलिसांनी पकडला. त्यातून साडेतीन लाख रुपये किंमतीचे 16 बैल आणि 10 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकुण 13 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन तिघांविरोधात अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम अहमद बाबर, मुरहसन शेख, रा.उत्तर प्रदेश व कालू मक्राणी, रा.अक्कलकुवा अशी अवैधरित्या गुरे वाहून नेणा:या संशयीतांची नावे आहेत. अक्कलकुवा शहराकडे चारचाकी वाहनातून मोठय़ा प्रमाणावर गुरेद वाहून नेली जात असल्याची माहिती अक्कलकुवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ब:हाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील राजमोही फाटय़ाजवळ सापळा रचला होता़ दरम्यान संशयित ट्रक आल्यानंतर तो अडवून झडती घेतली असता त्यात 16 बैलांना निर्दयीरित्या कोंबून बांधलेले असल्याचे आढळून आले होत़े पोलीसांनी ट्रक चालकाची चौकशी केली असता, त्याच्याकडे गुरांच्या वाहतूकीचा कुठलाही परवाना किंवा गोधन खरेदी-विक्रीच्या पावत्या आढळून आल्या नाहीत यातून पोलीसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला़ पोलीस कर्मचा:यांनी तीन लाख 60 हजार रुपये किंमतीचे 16 बैल व दहा लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकुण 13 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार पवार करीत आहे.
गुरांची अवैध वाहतूकप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:37 AM