लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू आहे़ यांतर्गत सोमवारी तीन पोेलीस ठाण्यांतर्गत सात वाहनांवर कारवाई करुन आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़सारंगखेडा पोलीस ठाण्यांतर्गत अवैध वाहू वाहतूक प्रकरणी नितीन संजय साळूंखे, अमोल दौलत जाधव दोघे रा़ नाशिक, बाबासाहेब बाबुराव खिल्लारे रा़ श्रीरामपूर, यांच्यावर गुन्हे दाखल केले़विसरवाडी गावाजवळ एमएच ४१ एयूझेड ४९५ या डंपरसह तीन वाळू वाहणारे ट्रक पकडण्यात आले़ याप्रकरणी चालक विठोबा उत्तम गादडा़ रा़ मालेगाव, किशोर रविंद्र चिकने रा़ मालेगाव, भाऊसाहेब सुपडू खैरनार रा़ देवळा व सचिन दीपक पगारे यांच्याविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले़नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीत लहान शहादे व शहरातील तळोदा रोडवर चार वाहनांवर कारवाई करण्यात आली़ याप्रकरणी मंडळाधिकारी राहुल देवरे यांच्या फिर्यादीवरुन चालक राजेश मानसिंग राठोड, ज्ञानेश्वर ठाणसिंग राठोड दोघे रा़ करगावतांडा ता़ चाळीसगाव, संतोष शिवाजी कोल्हे, रामचंद्र बंडू कोल्हे दोघे रा़ औरंगाबाद, यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़नंदुरबार तालुका पोलीस ठाणेंतर्गत न्याहली व चौपाळे गावाजवळ वाळू वाहतूक करताना सचिन अनिल भदाणे रा़ नाशिक, गजानन प्रतापसिंग सिंगल रा़ औ़बाद आढळून आल्याने गुन्हे दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान गेल्या आठवड्यात शहरातील तळोदा रोडवर महसूल पथकाने एका वाहनातून २३ टन वाळू जप्त केली आहे़ ही वाळू अहमदनगर जिल्ह्याकडे जात होती़ याप्रकरणी मंडळाधिकारी जयेश जोशी यांच्या फिर्यादीवरुन अशोक किशन संत रा़ नेवासा याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सर्व १४ जणांविरोधात मनाई आदेशांचे उल्लंघन केल्यास मास्क न वापरल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ कारवाईचे सत्र सर्व १२ पोलीस ठाण्यांतर्गत सुरु असताना चोरटी वाळू वाहतूक मात्र सुरू आहे़