लोकमत ऑनलाईनलहान शहादे, दि़ 8 : नर्सरीतून आणली जाणारी कोवळी झाडे लागवड केल्यानंतर पाणी देऊनही तीव्र उष्णतेने जळत असल्याने शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत होत़े यातून शेतक:यांनीच मार्ग काढून क्रॉप कव्हरचा नवा पर्याय निवडला आह़े सध्या नंदुरबार व शहादा तालुक्यात या क्रॉप कव्हरचीच चर्चा आह़े पपई उत्पादनात राज्यात दुसरा क्रमांक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात यंदाही किमान 2 हजार 300 हेक्टर क्षेत्रार्पयत पपई लागवड होण्याची चिन्हे आहेत़ ऐन उन्हाळ्यात होणा:या या लागवडीनंतर तीव्र उष्णतेतून रोपांची वाताहत होण्याचे प्रकार सातत्याने घडत होत़े यावर मार्ग काढून शेतक:यांनी सोलापूर जिल्ह्यात भेटी देत तेथील शेतक:यांकडून वापरण्यात येणा:या क्रॉप कव्हरची माहिती घेऊन त्याचा वापर सुरू केला आह़े यातून रोपांचे सरंक्षण होऊन नुकसान कमी होणार आह़े नंदुरबार तालुक्यातील बामडोद, समशेरपूर, लहान शहादे यासह विविध भागात या क्रॉप कव्हरचा सर्वाधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर शेतकरी भर देत आहेत़ सरीमध्ये आठ बाय आठ अंतर ठेवत रोपाच्या चारही बाजूस चार काडय़ा लावून त्यावर क्रॉप कव्हर चढवले जात आह़े यासाठी लागणा:या काडय़ा शेतकरी सुबाभळीचे उत्पादन घेणा:या शेतक:यांकडून खरेदी करत आहेत़ नंदुरबार तालुक्यात गेल्या 10 दिवसात किमान 100 एकरात लागवड झालेल्या पपईपैकी 70 एकरावर क्रॉप कव्हर करण्यात आले आह़े जाळीदार कागदापासून तयार झालेल्या या एका कव्हरची किंमत साधारण 1़30 ते 2़30 रुपये एवढी आह़े गुजरातसह पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी त्याची खरेदी करून आणत आहेत़ यामुळे मजुरांच्या रोजगारातही वाढ झाली आह़े नंदुरबार जिल्ह्यात उत्पादित करण्यात येणा:या पपईला यंदा सात रूपये प्रतिकिलो दर व्यापा:यांनी दिल्याने शेतक:यांचा हंगाम ब:यापैकी यशस्वी झाला आह़े यामुळे पपई लागवड क्षेत्र वाढीचे संकेत आहेत़ यंदाच्या वर्षात शेतकरी सोलापूर जिल्ह्यासह गुजरात राज्यातील आणंद आणि स्थानिक नर्सरीकडून रोपे तयार करून घेण्यावर भर देत आहेत़ राज्यातील पहिली पपई नर्सरीचा मान असलेल्या सोलापूर येथील नर्सरीतून एका शेतक:याने आठ हजार रोपांची खरेदी करून आणली आह़े त्यांच्याकडून तब्बल आठ एकरात यंदा पपई लागवड झाली असून त्यावर क्रॉप कव्हरही लावण्यात आले आह़े
पपई रोपांवर ‘क्रॉप कव्हर’चे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:44 PM