लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आह़े शेतातील कापूस, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांना पावसाचा मोठा फटका बसला असल्याची माहिती आह़े रांझणी परिसरात हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या भितीने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े रांझणी परिसरात गेल्या चार दिवसांपासून रात्री संततधार पाऊस पडत आह़े 9 रोजीही रात्री वादळासह पावसाने हजेरी लावली होती़ सलग दुस:या दिवशीदेखील पावसाने चांगलाच बरसला होता़ त्यामुळे सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े रिमङिाम पावसामुळे याचा दुष्परिणाम येथील पिकांवर होत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े पावसामुळे परिसरात ओलावा असतो़ अशा वातावरणात पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव होत असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात ेयेत आह़े रिमङिाम पावसामुळे ज्यारी पिक काहीसे काळसर पडत आह़े काही परिसरात ज्वारीची कापणी झाली आह़े त्यामुळे ज्वारीचे पिक वाया जाण्याचीही भीतीही निर्माण झाली आह़े परिसरात सोयाबीन पिकही काही शेतक:यांकडून कापण्यात आले असून त्याचेही नुकसान होणार की काय अशी चिंता शेतक:यांकडून वर्तविण्यात येत आह़े रांझणी परिसरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात लागवड करण्यात आलेल्या कापसाची बोंडेही परिपक्व झाली आह़े काही शेतात तर कापूसही फूटला असल्याचे दिसून येत आह़े अशा परिस्थितीत परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असल्याचे दिसून येत आह़े गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची कापणी झाली आह़े परंतु पाऊस सुरुच असल्याने काही शेतक:यांनी शेतातच सोयाबीन गोळा करुन तो झाकून ठेवला असल्याचे दिसून येत आह़े परंतु तरीदेखील सोयाबीन काही प्रमाणात ओला झाला असल्याने तो खराब झाला असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े प्रशासनाकडून मदत मिळावी4तळोदा तालुक्यात विशेषत रांझणीत यंदा ब:यापैकी पावसाची नोंद करण्यात आली आह़े परंतु सतत पावसाची रिमङिाम सुरु असल्याने पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन पिकांचे नुकसानही झाले आह़े आणि त्यात भरीसभर म्हणून परतीच्या पावसामुळेही आता परिसरातील पिकांचे नुकसान झाले आह़े त्यामुळे यातून शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने प्रशासनाने मदत करावी अशी अपेक्षा परिसरातील शेतक:यांकडून व्यक्त करण्यात आह़े पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आह़े
परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 2:32 PM