लोकमत न्यूज नेटवर्करांझणी/तळोदा : तालुक्यातील विविध भागात सोमवारी रात्री उशिरार्पयत कोसळलेल्या वादळी पावसामुळे ऊस व कापूस जमिनदोस्त झाला़ यामुळे शेतक:यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन तालुका प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही़ गेल्या आठवडय़ापासून रांझणी, प्रतापपूर, गोपाळपूर, पाडळपूर, आमलाड या भागात पाऊस सुरू आह़े तालुक्यात ठिकठिकाणी कमी अधिक स्वरूपात कोसळणा:या पावसाने सोमवारी सायंकाळी रौद्र रूप धारण केले होत़े वादळ वा:यासह सुरू झालेल्या पावसामुळे शेतशिवारातील ऊस, कापूस, पपई, मका, ज्वारी आणि इतर पिकांचे नुकसान झाले अनेक ठिकाणी पिके जमिनदोस्त झाली़ रात्री उशिरार्पयत सुरू असलेला हा प्रकार मंगळवारी सकाळी दिसून आला़ तालुक्यात साधारण 500 हेक्टर्पयत नुकसान झाल्याची माहिती आह़े
वादळी पावसामुळे पिके जमिनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:26 AM
भरपाईची मागणी : तळोदा तालुक्यातील रांझणी परिसरात नुकसान
ठळक मुद्दे उकाडा करतोय हैराण तळोदा तालुक्यातील रांझणीसह गोपाळपूर, पाडळपूर परिसरात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आह़े सोमवारी दुपारी प्रचंड उकाडा होत असताना, सायंकाळपासून पावसाला सुरूवात झाली होती़ यात ऊसाचे सर्वाधिक नुकसान झाले आह़े परिसरातील तुकाराम मराठे, प्रल