शहादा तालुक्यातील बामखेडा व वडाळी येथे शेतकरी पीक कर्ज मेळावा, तसेच पीक कर्जासंदर्भात शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात संमतीपत्र देण्यात आले. या मेळाव्याला जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, पं. स. चे माजी सदस्य गिरीश जगताप, जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष गजेंद्र गोसावी, सरपंच जामसिंग ठाकरे, उपसरपंच हिंमत सोनवणे, जि. प. सदस्या वृंदाबाई नाईक, के.डी. नाईक, ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक मुकेश हेडाऊ, तोरखेडाचे माजी सरपंच वसंत चौधरी, माजी उपसरपंच किशोर घोरपडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय खंडारे, वासुदेव पाटील, सजदेचे माजी सरपंच नारायण सामुद्रे, आदी उपस्थित होते.
आमदार डॉ. गावित म्हणाले की, मतदारसंघातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज, मुद्रालोन, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच बँकांनी शेतकरी, युवक व व्यापाऱ्यांना सहकार्य करावे. शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेशी संलग्न असलेल्या विविध कागदपत्राच्या अडचणी दूर व्हाव्यात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सिंगल विंडो पद्धतीने योजनेचा लाभ घेता यावा. पीक कर्जासंदर्भात बँकेत संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर अडीअडचणी दूर करण्यासंदर्भात महिन्यात बँकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात येईल.
प्रास्ताविकात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक मुकेश हेडाऊ यांनी पीक कर्जप्रकरणी अडीअडचणी असल्यास निराकारणासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे सांगितले. चंद्रमणी रायसिंग यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रामविकास अधिकारी भगवान देसले यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संदीप माळी, विजय गोसावी, विकी निकम, तलाठी महेश ठाकरे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ऋत्विज वाकलकर, किशोर भदाणे, उमेश निकम, आदींनी परिश्रम घेतले.
बामखेडा येथेही पीक कर्ज मेळावा
शहादा तालुक्यातील बामखेडा येथे ग्रामपंचायत सभागृहात माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत पीक कर्जाबाबत शेतकरी मेळावा घेण्यात आला. सेंट्रल बँकेचे शाखा प्रबंधक गजेंद्र कुमार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच मनोज चौधरी, पं. स. सदस्या अरुणाबाई पवार, उपसरपंच उखा भिल, ग्रामसेवक मनीष रामोळे, तलाठी नीलेश मोरे, कृषी सहायक संतोष वळवी, माजी उपसरपंच दिलीप बोरसे, माजी सरपंच छोटूलाल चौधरी, पोलीस पाटील योगेश चौधरी, सुनील पटेल, अशोक चौधरी, नितीन चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी सेंट्रल बँकेचे सहायक व्यवस्थापक सतीश कसबे, राकेश चौधरी, दीपक राठोड, लालचंद खैरनार, उत्तम सोनवणे, जितेंद्र जाधव, आदींनी परिश्रम घेतले.