प्रतापपूर/बोरद : युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने सोमवारी शेतक:यांनी तळोदा येथील शेतकरी सहकारी संघ व खाजगी व्यापा:यांकडे एकच गर्दी केली होती़ तळोदा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून युरिया व इतर खतांचा तुटवडा निर्माण झाला आह़े त्यामुळे शेतकरी वर्गाला खतासाठी भटकंती करावी लागत आह़े तळोदा तालुका खरेदी विक्री संघाने गुजरात राज्यातून खते खरेदी करुन शेतक:यांना काही प्रमाणात खते उपलब्ध केली आहेत़ त्यामुळे खरेदी विक्री संघात खते घेण्यासाठी शेतक:यांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती़ तळोदा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून खतांचा तुटवडा निर्माण झाला आह़े शेतक:यांनी खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत़ आंतर्गत मशागती पूर्ण झाल्या आहेत़ मात्र पिकांना खते मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आज तरी खते मिळतील या आशेने रोज तालुक्याच्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र व खरेदी विक्री संघ यांच्याकडे पायपीट करीत आहेत़ पिकांना खतांची नितांत गरज असून शेतक:यांना खतांसाठी भटकंती करावी लागत असल्याने शेतक:यांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आह़े याबाबत ‘लोकमत’तर्फे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाचे मोहिम अधिकारी प्रशांत शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भुसावळ-सूरत रेल्वे लाईनचे काम सुरु असून दौडाईच्यार्पयत खते येणे कठीण असल्याचे रेल्वे अधिका:यांचे म्हणणे आह़े दोन ते तीन दिवसात हे काम पूर्ण झाल्यावर खतांची टंचाई दूर होणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आह़े रेल्वे कामामुळे नंदुरबारसह धुळे येथेही खतांची टंचाई निर्माण झालेली आह़े नंदुरबारात जळगाव येथून काही प्रमाणात खते आणून त्यांची विक्री करण्यात येत आह़े काही दिवसांपूर्वी खते विक्रेत्यांकडे मुबलक प्रमाणात खतांची मात्रा उपलब्ध झाली होती़ परंतु त्यांच्याकडून नेहमीच्याच ग्राहकांना खतांची विक्री केली होती़ त्यामुळे यापासून बहुतेक शेतकरी वंचित राहिले होत़े कृषी विभागाने शेतक:यांची गरज लक्षात घेता खतांची टंचाई त्वरीत मिटवावी अशी मागणी शेतक:यांकडून करण्यात येत आह़े खतांअभावी शेतीचेही मोठे आर्थिक नुकसान होत आह़े खतांची टंचाई दूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आह़े
तळोद्यात युरिया खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:41 PM