नंदुरबार : प्रत्येक ग्राहकाला जीएसटी क्रमांक असलेले बिल देणे गरजेचे असतानाही, काही अपवादात्मक दुकानदार वगळता बहुतांश दुकानदार डुप्लिकेट बिल देऊन फसवणूक करीत आहेत. शहरी भागातील अनेक दुकानदार जीएसटी क्रमांक नसलेले बनावट बिल ग्राहकांना देत आहेत. यामध्ये ग्राहकांची फसवणूक होत आहे.
रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता
नंदुरबार : शहराबाहेरील बायपास व शहरातील रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. वाहने घसरून अपघात होत आहे. काही नागरिकांनी घरांचे बांधकाम करण्यासाठी रेती टाकली. ही रेती रस्त्यावर असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहे.
निर्जंतुकीकरण करा
तळोदा : शहरातील विविध भागांत डास व मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने फवारणीची मागणी आहे.