खापर : सेंट्रल बँकेच्या येथील शाखेत गेल्या तीन-चार दिवसांपासून बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी नसल्याने सर्व व्यवहार ठप्प झाल्याने बँक प्रशासन व बीएसएनएलबाबत ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.येथील सेंट्रल बँक शाखेची इंटरनेट कनेक्टिव्हिटी सोमवारपासून गेलेली आहे. याबाबत बँक व्यवस्थापनाशी चर्चा केली असता बीएसएनएलच्या सेवेत अडथळा असल्याचे सांगितले. बीएसएनएलचे अमोल लांडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता टॉवरवरील कार्ड नादुरुस्त झालेले असून गुरुवार्पयत सेवा सुरळीत होईल, असे सांगितले. गुरुवारी दुपारी सेवा सुरू झाली असून बँकिंग व्यवहार होत आहेत. मात्र गेल्या तीन दिवसात ग्राहकांना त्रास झाला असून यापुढे बीएसएनएलने सेवा सुरळीत सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाचे वाटप मोबाइल मशीनद्वारे केले जात असून त्यासाठी खेडय़ापाडय़ार्पयत शेकडो जण दररोज सकाळपासून बँक शाखेच्या बाहेर गर्दी करतात. त्यांना बँकेत बसण्यासाठी जागा नसल्याने बाहेर रस्त्यावर थांबून प्रतीक्षा करावी लागते.खापर येथील सेंट्रल बँकेची शाखा ग्राहकांसाठी नेहमीच त्रासदायक ठरत आहे. येथील बँकेत ग्राहकांना बसण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार करण्यासाठी येणा:या ग्राहकांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. बँकेत गर्दी झाल्यावर ग्राहकांना बाहेर उन्हात उभे राहावे लागते. या बँकेच्या शाखेचे दुस:या जागेत स्थलांतर करण्यासाठी दीड वर्षापासून प्रय} सुरू आहेत. मात्र अजूनही स्थलांतर होत नसल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो. सेंट्रल बँकेच्या वरिष्ठ अधिका:यांनी सर्व सोयींयुक्त जागेत या शाखेचे तातडीने स्थलांतर करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
कनेक्टिव्हिटीअभावी ग्राहकांचे हाल
By admin | Published: April 28, 2017 12:50 AM