म्हसावद : शहादा तालुक्यातील सुलवाडे शिवारातील म्हसावद रस्त्यावरील अज्ञात व्यक्तींनी पपईच्या शेतातील सुमारे 150 पपईची झाडे कापून फेकल्याची घटना उघडीस आली. यात संबंधित शेतक:याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा तालुक्यातील सुलवाडे परिसरात गेल्या वर्षभरापासून पपई, केळीची उभी पिके कापून फेकल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतक:यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. सुलवाडे येथील मिलिंद भरत पाटील यांचे सुलवाडे शिवारात म्हसावद रस्त्यावर पाच एकर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात पपईची लागवड केली आहे. त्यांचे सालदार जगदीश पवार हे सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गेले असता त्यांना शेतातील तीन ते चार महिन्याची वाढ झालेले पपईची सुमारे 150 झाडे व ठिबक सिचनच्या नळ्या अज्ञात माथेफिरूंनी कापून फेकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ आपल्या मालकाशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. पाटील यांनी म्हसावद पोलिसांना घटनेची माहिती दिल्याने पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व अज्ञात व्यक्तीविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद पाटील यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, केळी, पपई पिकाच्या नुकसानीसह शेती साहित्य चोरी व नुकसानीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पोलिसांनी या माथेफिरुंचा शोध घेऊत कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सुलवाडे शिवारात पपईची 150 झाडे कापून फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 12:27 PM