लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा पोलीस दलातर्फे सायबर सेफ वूमन हा उपक्रम हाती घेण्यात आला असून यांतर्गत विविध पोलीस ठाणे हद्दीत जनजागृती करण्यात येत आहे़ यांतर्गत शनिवारी डी़आऱहायस्कूलचे शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थिनींसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी संवाद साधला़यावेळी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनिल नंदवाळकर, उपप्राचार्य एस.व्ही. चौधरी, प्रा. एम.एल. अहिरराव, निशिकांत शिंपी, उमेश शिंदे, दामिनी पथक प्रमुख रोहिणी धनगर, मीना पवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना संदीप रणदिवे यांनी सांगितले की, महिलांनी स्वत:च्या सुरक्षितेसाठी सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करावा, महिलांची सुरक्षा हा विषय अत्यंत संवेदनशील बनला असून त्याबाबत विविध माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे. महिलांनी दैनंदिन जीवनात इंटरनेटशी संबंधीत सर्व अॅप्स वापरतांना दक्षता घ्यावी, वैयक्तिक माहिती सोशल मिडियावरल अनोळखी व्यक्तीला पाठवू नये, इंटरनेटवरील फसव्या संदेशापासून सावध रहावे, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलीसांची मदत घ्यावी़पोलीस निरीक्षक नंदवाळकर यांनी यांनी मोबाईलमधील विविध अॅपच्या वापरामुळे मुलींची व महिलांची होणारी फसवणूक याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.पोलीस निरीक्षक रणदिवे यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे माहिती देत सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती समजावून दिली़ शिक्षिका व विद्यार्थिनींच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून देण्यात आली़ दामिनी पथकाच्या महिला कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थिंनीसोबत संवाद साधत चर्चा केली़ येत्या काळात जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे़सायबर सेलआनलाईन संवाद, सोशल इंजिनियरिंग, फिशिंग, नोकरीचे लाभ दाखवून होणारी फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून होणारी फसवणूक, बँकिंग विषयक फसवणूक, व्हॉटसअॅप, फेसबुक प्रोफाईल फोटोंचा गैरवापर, चाईल्ड पोर्नोग्राफी, सायबर ग्रुमिंग, सायबर बुलींग, मार्फिंग, सायबर बदनामी, आॅनलाईन हालचालींचा पाठलाग, आॅनलाईन गेमिंगमुळे महिलांची सुरक्षा या विषयावर सायबर सेलकडून जनजागृती होत आहे़
पोलीस दलाकडून सायबर जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 12:29 PM