लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 1 : सायबर सुरक्षा व महिलांसदर्भातील कायदे या विषयी जिल्हा पोलिसांतर्फे आयोजित सप्ताहाचा गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. सप्ताहभरात विविध उपक्रम घेण्यात येणार असून जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा सप्ताह होत आहे.सोशल मिडियाचा अतिवापर, सायबर क्राईम, महिलांच्या सुरक्षेचे कायदे यासह महिला अत्याचार या विषयांवर विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवार, 1 रोजी सकाळी साडेआठ वाजता पंचायत समिती सभागृहात सप्ताहाचा शुभारंभ झाला़. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड.उमा चौधरी, सिमा मोडक, सहायक पोलीस निरीक्षक न्हायदे यांनी मार्गदर्शन केले. 3 मार्च रोजी कमला नेहरू कन्या विद्यालयात सकाळी साडेआठ वाजता मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे. 5 मार्च रोजी दुपारी तीन वाजता श्रॉफ विद्यालयात मार्गदर्शन केले जाणार आहे. 6 मार्च रोजी डॉ.काणे गल्र्स हायस्कूल व डी.आर.विद्यालयात डॉ.वृशाली पाटील, पोलीस उपअधीक्षक तुंगार हे मार्गदर्शन करतील. 7 रोजी जिजामाता महाविद्यालयात सकाळी साडेआठ वाजता जनजागृतीपर उपक्रम होणार आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ मंदीरात व्यापक स्वरूपात उपक्रम होणार आहे. पुणे येथील सायबर क्राईम तज्ज्ञ संदीप गादीया हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सायबर सुरक्षा सप्ताहास नंदुरबारात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:04 PM