लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : सातपुडय़ाचा दुर्गम भाग आणि द:याखो:यांनी व्यापलेल्या अक्कलकुवा-धडगाव मतदार संघात सकाळी आठ वाजेनंतर मतदान प्रक्रियेला वेग आला़ द:या खो:यातील पाडय़ांवर राहणा:या आदिवासी महिला आणि पुरुषांचे जत्थे दाखल होण्यास प्रारंभ झाल्याने मतदान केंद्रे गर्दीने फुलून गेले होत़े तालुक्यातील सर्वात मोठे मतदान केंद्र असलेल्या मांडवी बुद्रुक येथील 288, 289 आणि 290 या तीन मतदान केंद्रांवर सकाळी सातपासून मतदार उपस्थित होत़े मांडवी बुद्रुक येथील शासकीय आश्रमशाळेत मतदान केंद्र तयार करण्यात आले होत़े महिलांची संख्या ही सर्वाधिक होती़ तालुक्यातील भोगवाडे बुद्रुक येथील मतदान केंद्रावर येण्यासाठी रोंडुलचा पाडा येथील महिला आणि पुरुष मतदारांची तब्बल पाच ते सहा किलोमीटर पायपीट सकाळपासून ऊन वाढूनही मतदार टप्प्याटप्प्याने येथे येत होत़े मातीच्या रस्त्यांवरुन पायपीट करत आलेल्या या मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून आपले अस्तित्त्व दर्शवून दिल़े भोगवाडे बुद्रुक येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत हे मतदान केंद्र होत़े तालुक्यातील धनाजे बुद्रुक, रोषमाळ खुर्द आणि बुद्रुक, उमराणी, खरवड, पालखा या सर्वच ठिकाणी दुपारी चार वाजेर्पयत मतदारांची तोबा गर्दी झाली होती़ ओळखपत्र आणि वोटींगस्लिपसह मतदार रांगेत उभे राहत होत़े मतदानादरम्यान खरवड येथील 80 वर्षीय जि:या पावरा यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी 18 वर्ष पूर्ण झाल्यापासून मतदान करत आह़े 42 वर्ष मतदान करुनही मातीच्या रस्त्यावरुन पायी यावे लागत असल्याची खंत व्यक्त करत, मतदान हे राष्टीय कर्तव्य असल्याचे सांगितल़े भोगवाडे येथील 88 वर्षीय चमा:या सत्या पावरा यांनी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने प्रत्येकाने ते बजावले पाहिजे असे सांगितल़े
द:याखो:यातून झाली मतदानासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:01 PM