ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 23 : सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून जिल्ह्यातील घाट रस्त्यांचे सव्रेक्षण करण्यात येत आह़े दरडप्रणव क्षेत्र तसेच ज्या मार्गावर वारंवार आपत्ती येते अशा मार्गावर उपाय योजना करून प्रशासनाकडून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ जिल्ह्यातील गावांमध्ये भूस्खलनाचा धोका नसला तरी घाटांमध्ये मोठय़ा प्रमाणात भूस्खलन होत असल्याने प्रशासनाकडून यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आह़ेजिल्ह्यात मोठय़ा संख्येने घाटमार्ग आहेत़ पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने घाटांवर भूस्खलन होऊन परिणामी मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळण्याच्या घटना या आधीही जिल्ह्यात झाल्या आहेत़ त्यामुळे साहजिकच पावसाळ्याच्या पाश्र्वभूमिवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाट मार्गाची चाचपणी करून त्यावर उपाय योजना करण्यात येत आहेत़ जिल्ह्यात चार मोठे घाटमार्ग हे अत्यंत धोकेदायक आहेत़ मागील इतिहास बघता यावर दरडी कोसळण्याच्या तसेच भूस्खलन होण्याच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आपल्या कंत्राटदारांच्या माध्यमातून उपाय योजना करण्यास सुरुवात करण्यात आली आह़े तसेच भूस्खलनामुळे दरड कोसळलीच तर तत्काळ ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करुन ब्लॉक झालेला रस्ता मोकळा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़ेजिल्ह्यातील सोनगीर-दोंडाईचा राष्ट्रीय महामार्गावरील शहादा-धडगाव घाट, राष्ट्रीय महामार्ग क्र मांक आठवरील रोषमाळ-धडगाव व कोठार-तळोदा घाटमार्ग तसेच महामार्ग क्रमांक तीनवरील मोलगी-डाब-अक्कलकुवा हे चार घाटमार्ग अत्यंत धोकेदायक असल्याचा अहवाल शहादा व नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला आह़े त्यामुळे संबंधित मार्गाची पाहणी करून त्या ठिकाणी सर्व उपाय योजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आह़ेघाटमार्गावरील भूस्खलन रोखण्यासाठी गॅबियन पध्दतीचा वापर उपयुक्त ठरु शकतो़ या पध्दतीमध्ये घाटाच्या पायथ्या लगत चौकोनाकृती विशिष्ट प्रकारे बॉक्स ठेवण्यात येत असतात़ त्यात दगडे ठेवली जातात़ पावसाचे पाणी आल्यास ते घाटाच्या लगत ठेवलेल्या गॅबियन बॉक्समधून वाहत जात़े त्यामुळे घाटाच्या पायथ्यात पाणी ङिारपत नाही व परिणामी भूस्खलन होऊन दरड कोसळण्याच्या घटनांना आळा बसतो़
नंदुरबारातील घाटमार्गावर होतेय ‘डॅमेज कंट्रोल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:21 PM