लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील जावदेतर्फे बोरद येथील लीलाबाई यादव चौधरी या महिला शेतक:याच्या शेतातील केळी पिकाचे सुमारे 60 ते 70 झाडे कापून 80 हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली. यापूर्वी 17 सप्टेंबर रोजीही अनोळखी व माथेफिरू व्यक्तीकडून 40 केळीची झाडे कापून नुकसान केले होते. या घटनांमुळे शेतकरी हवादिल झाले आहेत. याबाबत म्हसावद पोलिसात तक्रार देऊनही पोलिसांकडून आरोपीचा शोध लागत नसल्यामुळे शेतक:यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत यादव चौधरी यांच्या आई लिलाबाई यादव चौधरी यांचे जावदा शिवारातील गट नं. 5/2 या क्षेत्रातील सहा एकर केळीची लागवड केली आहे. 13 ऑक्टोबर रोजी रात्री अनोळखी व माथेफिरू लोकांनी केळीची 60 ते 70 झाडे कापून या घटनेची पुनरावृत्ती केली. मागील महिन्यात अशीच घटना घडली होती. त्यावेळी देखील केळी, पपई व कापसाच्या झाडांचे नुकसान करण्यात आले होते. त्यामुळे शेतक:यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आतादेखील संबंधित शेतक:यांचे अंदाजे 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. प्रशांत चौधरी रात्री उशीरार्पयत शेतातच होते. सकाळी शेतात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. काढणीवर आलेल्या केळीच्या झाडांचेच हे माथेफिरु नुकसान करतात. त्यामुळे परिसरातील शेतक:यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण असून माथेफिरुंचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.17 सप्टेंबर रोजीही चौधरी यांच्या शेतातील केळीची झाडे कापून नुकसान केल्याने त्यांनी 18 सप्टेंबर रोजी म्हसावद पोलीस स्टेशनला लेखी तक्रारी अर्ज दिला होता. परंतु पोलीस प्रशानाने दखल घेतली नाही . वेळीच या घटनेची पोलिसांनी दखल घेतली असती तर या घटनेची पुनरावृत्ती झालीच नसती. पिकासोबतच शेती साहित्य चोरीला जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुन्हा अशा घटना होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिका:यांनी लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील शेतक:यांकडून होत आहे.
केळीची झाडे कापून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:25 PM