लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुका सत्र न्यायालयाने एकास शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी भरपाई देण्याची शिक्षा सुनावली आह़े 2010 मध्ये ही घटना घडली होती़ न्यायाधीश निलेश येलमाने यांनी ढोरपाडा ता़ नवापूर येथील इंद्या उर्फ इंदाव जिवल्या गावीत यांला ही शिक्षा सुनावली आह़े ढोरपाडा येथे 2010 मध्ये लोकसभा निवडणुकीनिमित्त होणा:या मतदानावर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता़ यावेळी येथे पोलीस बंदोबस्त होता़ यादरम्यान इंद्या गावीत यांने शासकीय बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीसांच्या वाहनास लाकडाने मारून पुढील काच फोडला होता़ त्याच्याविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात पोलीस उपनिरीक्षक एल़एस़शेवाळे यांनी दोषारोपत्र दाखल केले होत़े खटल्याचे कामकाज नवापूर न्यायालयात सुरू होत़े पोलीस कॉन्स्टेबल इंदिरा वळवी, निजामसिंग पाडवी, सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या साक्षीवरून न्यायालयाने आरोपीस 500 रूपये दंडाचे आदेश दिल़े तसेच चांगल्या वतरुणुकीबाबत एक वर्षाचे बंधपत्र करण्याचे आदेश दिल़े सरकारी वकील विद्या देवरे यांनी कामकाज पाहिल़े
नुकसान करणा:याकडून भरपाई करून घेण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:45 PM