लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/प्रकाशा : तालुक्यातील वैजाली व परिसरात वाकी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गावातील घरांमध्ये व शेतातील उभ्या पिकांमध्ये पुराचे पाणी गेल्याने मोठय़ा प्रमाणात शेतजमिनीचे नुकसान झालेले आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करुन नागरिकांना दिलासा दिला.वाकी नदीला 2006 नंतर याच आठवडय़ात दोनवेळा मोठे पूर आल्याने वैजाली, नांदर्डे, वाघोदा, करणखेडा, काथर्दा दिगर, पुनर्वसन या गावांमध्ये व शेतात मोठय़ा प्रमाणात पाणी शिरल्याने पुराच्या पाण्यात पिकांसह शेतजमीन वाहून गेली. पिके पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे. पिकेच नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. नांदर्डे, वैजाली, वाघोदा, काथर्दा, करणखेडा, पुनर्वसन गावामध्ये वाकी नदीसह दिवापाठ नाला, मोत्यानाला कोळ्या नाला, लेंडय़ा नाल्यांनाही पूर आल्याने आदिवासी वस्तींमध्ये पुराचे पाणी घराघरांमध्ये गेल्याने घरांचेही नुकसान झाले आहे. दोन दिवस लागोपाठ पाऊस झाल्यानंतर प्रथमच या भागात मोठी पूरस्थिती होती. पूर ओसरल्यानंतर शुक्रवारी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी सर्व गावात व शेतशिवारात जाऊन पहाणी केली. या वेळी डॉ.सुप्रिया गावीत, शरद राठोड, शेखर पाटील, भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष संजय पाटील, वि.का. सोसायटीचे माजी चेअरमन श्रीराम पाटील, पंकज पाटील, प्रविण पाटील, वैजालीचे सरपंच विश्राम धारपवार, उपसरपंच विनोद पाटील, संजय साळुंके, नांदर्डेचे सरपंच रमेश ठाकरे, उपसरपंच दिपाली माळी, सतीश पाटील, सुभाष पाटील, शरद पाटील, कृष्णा ठाकरे, जितेंद्र चव्हाण, वाघोदाचे सरपंच गोपाल ठाकरे, भारत पाटील, शांतीलाल पाटील, शरद पाडवी, मंडळ अधिकारी बच्छाव उपस्थित होते.
वैजाली परिसरात नुकसानीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:47 PM