लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : राज्यभरात मका पिकावर लष्करी अळीने थैमान घातले असताना शहादा तालुक्यातील बामखेडा परिसरासह कळंबू कृषी मंडळातदेखील या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते आहे. बामखेडासह कळंबू कृषी मंडळातील गावांमध्ये एकूण 975 हेक्टर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली आहे.कमी खर्चात हमखास उत्पादन देणा:या मका पिकाची लागवड यंदा शेतक:यांकडून करण्यात आली आहे. मात्र अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे जोमाने वाढणारे मका पीक उद्ध्वस्त होत आहे. महागडी औषधांची फवारणी करूनही फरक पडत नसल्याने परिणामी उत्पादनात घट होऊन शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.मका पिकावरील अळींचा प्रादुर्भाव जाणवत असून, तयार झालेली मक्याची कणसे अळी पूर्णपणे पोखरून हिरवे पिक वाया जात आहे. यावर प्रतिबंध म्हणून शेतकरी मोठय़ा प्रमाणात फवारणी करून ही लष्करी अळीचा अटकाव कमी होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.काही शेतक:यांनी प्रतिबंध उपाययोजना म्हणून मका पिकात क्रासअॅप पध्दतीने फोरमेन ट्रॅप सापळे बसविले असून तेथे कमी प्रमाणात प्रादुर्भाव जाणवत आहे. उत्पादन येईर्पयत किती संकटांचा सामना करावा लागेल हे सांगणे शेतक:यांना जिकिरीचे झाले असून, अन्य पिकांच्या तुलनेने मका पिकांवर केलेला खर्च जेमतेम निघेल. परंतु ती आशा झालेले नुकसान पाहता फोल ठरत आहे. तरी शासनाने मका पिकाच्या झालेल्या नुकसानीची पहाणी करून योग्य ती मदत करावी, अशी शेतक:यांच्या वतीने करण्यात आली आहे.
बामखेडा परिसरात मकावर लष्करी अळीने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:18 PM