लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : घरी आलेल्या आत्याच्या पाया पडली नाही या कारणावरून स्वतःच्या मुलीला व पत्नीला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडी दिली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील दशरथ नगर भागात राहणारे दादाभाई तुकाराम पिंपळे यांची बहिण उषाबाई ही त्यांच्या राहत्या घरी आली असताना दादाभाई ने त्यांची मुलगी कु.आशा हिला तिची आत्या उषाबाई यांचा पाया पडायला सांगितले. त्यास आशा ने नकार दिला. याचा राग येऊन रविवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास स्टीलच्या उलथनीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. यावेळी पत्नी भामिनी या मध्यस्थी करायला गेल्या असता त्यांनाही गळा दाबत डोके किचन ओट्यावर आपटून दुखापत केली. त्याप्रमाणे लग्न झाल्यापासून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत शहादा पोलिसात भामिनी दादाभाई पिंपळे यांच्या फिर्यादीवरून दादाभाई तुकाराम पिंपळे, रा. दशरत नगर, फॉरेस्ट ऑफिस समोर, शहादा व उषाबाई तुकाराम पिंपळे रा.सिध्दार्थ नगर, शिंदखेडा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील करीत आहेत.
आत्याचा पाया न पडल्याने मुलगी व पत्नीला जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:09 PM