लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खुनाच्या गुन्ह्यात अडकवल्याचा राग धरुन कोराई ता़ अक्कलकुवा येथील हाणामारीतून तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला़ तिघांवर चाकू आणि भाल्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत़ मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़ भराडीपादर ता़ अक्कलकुवा येथील जहागू सुंदा वसावे यांच्या पत्नीचा खून झाला होता़ याप्रकरणी जहांगू वसावे व त्यांच्या कुटूंबियांनी हिरालाल वसावे व त्याच्या मुलांविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ या प्रकारानंतर हिरालाल वसावे हा कुटूंबासह कोराई ता़ अक्कलकुवा येथे राहण्यासाठी आला होता़ दरम्यान मंगळवारी सकाळी 11 वाजता जहांगू वसावे हे कोराई येथे आले होत़े याठिकाणी हिरालाल आटय़ा वसावे, योगेश हिरालाल वसावे, अविनाश हिरालाल वसावे, चंदन हिरालाल वसावे, चंपाबाई हिरालाल वसावे, मिराबाई दिनेश पाडवी, दिनेश लाख्या पाडवी, मनेश पाडवी यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी त्याठिकाणी उपस्थित सुरेश भामटा वसावे, देविदास सुरेश वसावे, अनिलाबाई करण वसावे, सरलाबाई सुरेश वसावे, ओलीबाई जहागू वसावे, केशरसिंग राज्या वसावे, सुमित्राबाई केशरसिंग वसावे यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला़ दरम्यान हिरालाल याने हातातील चाकू जहागू वसावे याच्या पोटात मारला होता़ तसेच अविनाश याने हातातील भाला सुरेश वसावे याच्या डोक्यात मारला होता़ घटनेमुळे कोराई व खापर परिसरात तणाव निर्माण झाला़ कोराई व भराडीपादर येथील नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण आले होत़े याप्रकरणी केसरसिंग वसावे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन हिरालाल, योगेश, अविनाश, चंदन, चंपाबाई वसावे, मिराबाई, दिनेश व मनेश पाडवी याच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे करत आहेत़ चाकूसह भाल्याचा वार झाल्याने गंभीर जखमी झालेल्या जहागु वसावे, सुरेश वसावे, देविदास वसावे यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुगणलयात दाखल करण्यात आल़े त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी सर्व आठ संशयितांना पोलीसांनी अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले असता 29 जून र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़
खुनात अडकवल्याच्या रागातून प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:31 PM