लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सलसाडी, ता.तळोदा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्याथ्र्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत जमावाने तळोदा आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा प्रांताधिकारी विनय गौडा व तहसीलदार योगेश चंद्रे यांना मारहाण केली. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सचिन चंद्रसिंग मोरे (11) रा.गढीकोठडा, ता.तळोदा हा पाचवीचा विद्यार्थी सकाळी आश्रमशाळेतील कुपनलिकेचे बटन सुरू करण्यासाठी गेला असता त्याला शॉक लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही बाब गावातील लोकांना व पालकांना समजताच शेकडोंचा जमाव शाळेत जमला. या ठिकाणी भेट देण्यासाठी आदिवासी प्रकल्प अधिकारी विनय गौडा व तहसीलदार योगेश चंद्रे गेले असता त्यांना जमावाच्या संतापाला सामोरे जावे लागले. जमावाने दोघांना धक्काबुकी करीत मारहाण देखील केली. दोघे त्यात जखमी झाले. दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यासंदर्भात दुपारी उशीरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे आदिवासी विकास विभागात खळबळ उडाली आहे.