ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.28- लगAास नकार दिला म्हणून माथेफिरू युवकाने पेटवून दिल्याने तळोदा येथे 60 टक्के जळालेल्या तरुणीची अखेर मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली़ सुरत येथे उपचार घेत असताना तिचा शुक्रवारी मृत्यू झाला़ तिच्या मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या तळोदा पोलीस ठाण्याने या प्रकरणातील तिघांना अटक केली आह़े यातील एक आरोपी हा अल्पवयीन आह़े
16 मे रोजी मध्यरात्रीनंतर घडलेल्या क्रूरतेनंतर जळत्या कांती बाज्या गावीत (18) रा़ आंबागव्हाण ता़ तळोदा या युवतीला घटनास्थळावर सोडून पळालेल्या संशयितांचा पोलीस शोध घेत होत़े त्यातीलच मुख्य आरोपी संजय दारासिंग वळवी हा शनिवारी सकाळी अचानक तळोदा शहरातच पोलीसांच्या हाती आला़ त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आह़े यापूर्वी पोलीसांनी युवतीचा अल्पवयीन चुलत मामा व जितेंद्र राजाराम वसावे यास ताब्यात घेतले होत़े वसावे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आह़े तर अल्पवयीन चुलत मामाची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आह़े जळाल्यानंतर नंदुरबार जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेत असलेल्या युवतीला उपचार मिळत नसल्याने तिच्या कुटूंबियांना सुरत येथे उपचारासाठी दाखल केले होत़े
मयत बाज्या कांती गावीत हिच्यावर आंबागव्हाण ता़ तळोदा येथे शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत़ अत्यंत हिंसकवृत्तीने झालेल्या या घटनेतील युवतीचा मृत्यू झाल्यानंतर पोलीसांनी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आह़े
जाळणारा अखेर तळोद्यात सापडला
18 वर्षीय युवतीला जाळणारा मुख्य संशयित संजय दारासिंग वसावे हा शनिवारी खर्डी नदी पुलावरून तळोदा शहरात पायी येत असताना पोलीसांना दिसून आल्याने त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी दिली आह़े एक आरोपी अल्पवयीन असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आह़े मुख्य संशयित संजय याला ताब्यात घेण्यासाठी आंबागव्हाण ता़ तळोदा येथे ग्रामस्थांनी 10 दिवसांपासून दिवसरात्र एक केला होता़ या ग्रामस्थांनी पोलीसांना संजय हा तळोद्यात असल्याची माहिती दिली होती हे विशेष़़़