शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नंदुरबार जिल्ह्यात रस्ते अपघातात दर दीड दिवसाआड जातोय एकाचा प्राण

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: February 8, 2018 12:45 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या चार वर्षात म्हणजे 2014 ते 2017 दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 2 हजार 342 अपघात झाले आहेत़ त्यापैकी 553 ‘फेटल’ म्हणजे प्राणांकित अपघातात तब्बल 652 जणांना आपल्या जिवाला मुकावे लागले आह़े जिल्ह्यात सातत्याने अपघातांचे सत्र सुरु आह़े त्यामुळे हे आकडे संवेदनशिल व्यक्तींचे नक्कीच लक्ष ...

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या चार वर्षात म्हणजे 2014 ते 2017 दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 2 हजार 342 अपघात झाले आहेत़ त्यापैकी 553 ‘फेटल’ म्हणजे प्राणांकित अपघातात तब्बल 652 जणांना आपल्या जिवाला मुकावे लागले आह़े जिल्ह्यात सातत्याने अपघातांचे सत्र सुरु आह़े त्यामुळे हे आकडे संवेदनशिल व्यक्तींचे नक्कीच लक्ष विचलीत करणारे ठरत आहेत़ प्रशासकीय कार्यतत्परतेला वाहनधारकांच्या स्वयंशिस्तीची जोड मिळाल्यास अपघातांच्या मालिकांना नक्कीच ‘स्पीडब्रेकर’ निर्माण होऊ शकतो़ जिल्ह्यात रोजच छोटय़ा-मोठय़ा अपघातांच्या घटना घडत आह़े ही बाब अत्यंत चिंताजनक आह़े कारण गेल्या चार वर्षात तब्बल 652 जणांचा या भिषण अपघातात मृत्यू झाला आह़े विशेष म्हणजे 2016 मध्ये सर्वाधिक म्हणजे 623 अपघातांच्या घटना घडल्या आहेत़ यातील ‘फेटल’ म्हणजे प्राणांकित अपघातांची संख्या ही 154 असून त्यात तब्बल 179 जणांना आपले प्राण गमवावे लागले आह़े रस्त्यांची दैनिय स्थिती, वाहनांचा वाढता बेशिस्त वापर, अवजड वाहनांची समस्या तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे झालेले तिनतेरा यामुळे गेल्या चार वर्षात अपघातांचा आलेख पाहिला असता यात वाढ झाल्या दिसून येत आह़े गेल्या चार वर्षात तब्बल 2 हजार 342 अपघात झाले आहेत़ त्यामध्ये शेकडो जण जखमीही झालेत आहेत़ गेल्या काही वर्षामध्ये जिल्ह्यात कमालीची बेशिस्त वाहतूक वाढली आह़े याचा परिणाम म्हणून अपघातांच्या संख्येतही घसघशीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आह़े शहरी भागासह  ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर खड्डे तसेच साईडपट्टयांची समस्या जाणवत आह़े त्यामुळे सध्याची रस्त्यांची स्थितीही या अपघातास कारण की. अशीच दिसून येत आह़े दरम्यान, अनेक ठिकाणचे निमुळते रस्ते, धाकेदायक वळणे आदी ठिकाणी अपघातांच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याचे काही दिवसांमध्ये दिसून येत आह़े जिल्ह्यातील पुलांची पुलांची स्थितीदेखील अत्यंत दैनिय झाली आह़े त्यामुळे अशा पुलांचे सव्रेक्षण  करुन प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आता करण्यात येत आह़े याबाबत ऑडीट होणे अपेक्षीत आह़े जिल्ह्यातील अपघातांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय या चारही प्रशासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय साधत रस्ते अपघात रोखण्यासाठी व बचाव कार्यासाठी संयुक्त मोहिम राबवावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, सर्वाधिक अपघात हे महामार्गावर होत असतात़ त्यामुळे यावर काही तरी दुरगामी परिणामकारक ठरेल अशी उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आह़े महामार्गावर अनेक ‘डेड स्पॉट’ आहेत़ पोलीस प्रशासनाकडून प्रामुख्याने नवापूर जवळील कळवन, वावद तसेच ठाणेपाडा हे तिन ‘डेड स्पॉट’ जाहीर करण्यात आले आह़े या तीन ठिकाणी सर्वाधिक अपघाती मृत्यूची संख्या वाढली आह़ेमहामार्गावर ‘एचएसपी’ म्हणजेच ‘हायवे सेफ्टी पेट्रोल’ विभागाकडून पेट्रोलिंग करण्यात येत असत़े आवश्यक त्या ठिकाणी ‘रिफ्लेक्टर’देखील बसविण्यात येणार असल्याचीही माहिती पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आह़े अपघातावर आळा घालण्यासाठी सामाजिक बांधकाम विभागाशीही समन्वय साधला जात आह़े