लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील नावली येथील शासकीय माध्यमिक निवासी आश्रमशाळेत सहावीत शिकणा:या विद्यार्थिनीचे शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन झाले. सेंट्रल किचन योजनेमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. तालुक्यातील शिर्वे येथील रहिवासी असलेली जयश्री जालमसिंग वसावे ही विद्यार्थिनी नावली येथील शासकीय माध्यमिक निवासी आश्रमशाळेच्या सहावीत शिकत होती. जागतिक आदिवासी दिनी रात्री तिचा अचानक मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला नेण्यात आले होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.के.डी. सातपुते यांनी मृत बालिकेचे शवविच्छेदन केले. जिल्ह्यात सध्या आश्रमशाळांमधे सेंट्रल किचन योजना राबविण्यात येत आहे. तेथून देण्यात येणा:या जेवणात खाण्याचा सोडा व केमिकलचा वापर होत असून विद्याथ्र्यानी कमी जेवण केल्यावरही त्यांचे पोट भरले जाते, असा आरोप पालकांकडून होत असल्याचे भारतीय ट्रायबल पार्टीचे तालुकाध्यक्ष के.टी. गावीत व युवा जिल्हाध्यक्ष अहरोन गावीत यांनी पत्रकान्वये म्हटले आहे. या योजनेचा राज्यात पहिला बळी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या जेवण पद्धतीमुळे आदिवासी विद्याथ्र्यामध्ये मोठे घबराटीचे वातावरण असल्याचे स्पष्ट करून ही पद्धत रद्द करून आश्रमशाळांमधे पूर्ववत मेस पद्धत आणली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. नुकसान भरपाई म्हणून जयश्रीच्या पालकांना दोन लाखांऐवजी शासनाने 25 लाख रुपये द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शोकाकूल वातावरणात शिर्वे येथे जयश्री वसावेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नावली आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:53 PM