लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : दिवाळीच्या कालावधीत साजरी अश्वस्थामा यात्रोत्सवात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी अस्तंबा ता.धडगाव येथे पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची यात्रापूर्व बैठक घेण्यात आली. यावेळी यात्रेत दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.अस्तंबा येथे अश्वस्थामा ऋषी महाराजांची एकमेव यात्रा भरविली जात असल्यामुळे यात्रेला येणा:या भाविकांची संख्या अधिक असते. या यात्रेत भाविकांना कुठलाही धोका निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे व अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची संयुक्त बैठक अस्तंबाच्या दोन्ही युवा पोलीस पाटलांनी घडवून आणली. बैठकीत पोलीस निरीक्षक डी.एस.गवळी, अस्तंबा फॉरेस्टचे पोलीस पाटील अंबालाल वसावे, अस्तंबा महसुलचे पोलीस पाटील मानसिंग वळवी, पोलीस कर्मचारी मधुकर राऊत, अजय कोळी, तुकाराम वसावे, अभिमन्यू गावीत, वनसिंग वळवी, फोज्या वळवी, पोपटा वसावे आदी उपस्थित होते. दारुमुळे शांतता व सुरक्षा व्यवस्था ढवळून निघते, गावात दारुबंदी असली तरी यात्रेत बाहेरुन दारु विक्रीसाठी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी या बैठकीत दारुबंदीचे कठोर निर्णय घेण्यात आले आहे. यासाठी पोलीस प्रशासन व तेथील ग्रामस्थ तत्पर झाले असून यात्रेसंबंधित सर्व निर्णय दोन्ही यंत्रणेमार्फत संयुक्तपणे घेतले जाणार आहे. बैठकीत घेतलेले निर्णय यात्रा संपेर्पयतच नव्हे तर कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भाविकांना शांततेत व सुरक्षीत यात्रा करता येणार आहे. शिवाय तेथे नेहमी सलोख्याचे वातावरण राहणार आहे. अस्तंबा येथे जाण्यासाठी तोन प्रमुख मार्ग आहेत. त्यात धडगावमार्गे कालीबेल, असलीवरुन जाता येते. अक्कलकुवाकडून जाणा:या यात्रेकरुंना डाब, जमाना व असलीवरुन जाता येणार आहेत. तर तळोदा तालुक्यातूनही तेथे पोहोचता येते. परंतु या मार्गाने जाणा:या भाविकांना काही वेळ पायी चालावे लागणार आहे. त्यामुळे बहुतांश भाविक हे धडगाव अथवा अक्कलकुवा मार्गेच जाणार आहे.
यात्रेनिमित्त सोंगाडय़ांचे कार्यक्रम दि. 24 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवस राहणार आहे. याशिवाय होब घेऊन येणा:यांकडून असे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा गोंधळ होऊ नये, यासाठी होब यात्रेकरुंना आधी कार्यक्रमांची पडताळणी करावी लागणार आहे, कार्यक्रम यात्रा संयोजकांकडून मिळणा:या सूचना व वेळेतच घेता येणार आहे. तसा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.