लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत माझगाव डॉक शिप बिल्डर्स यांच्यामार्फत सीएसआर निधीतून घेण्यात आलेल्या ११ रुग्णवाहिकांचे पालकमंत्री ॲड. पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यापैकी नऊ रुग्णवाहिका ग्रामीण भागासाठी आणि दोन जिल्हा रुग्णालयासाठी उपयोगात येणार आहेत. ग्रामीण भागातील रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिकांचा चांगला उपयोग होईल असा विश्वास यावेळी ॲड. पाडवी यांनी व्यक्त केला.पोलीस वाहनांचे लोकार्पणपालकमंत्र्यांच्या हस्ते १३ पोलीस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या वाहनांसाठी ९० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. पोलिसांना वाहन प्राप्त झाल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत होणार आहे. पोलीस दलासाठी आवश्यकतेनुसार आणखी वाहने देण्यात येतील असे ॲड. पाडवी यांनी यावेळी सांगितले.रक्तपेढी इमारतीचे उद्घाटनॲड. पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय परिसरातील रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. ही इमारत सर्व सुविधांनी युक्त असणार आहे. जिल्ह्यातील रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी आणि रक्त परीक्षणासाठी रक्तपेढी आदिवासी भागासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पालकमंत्र्यांनी रक्तपेढीतील विविध सुविधांची माहिती घेतली.मोबाईल बँकेचे उद्घाटनदुर्गम भागातील बँकिंग व्यवहार सुरळीत व्हावे आणि नागरिकांना गावातच बँकेची सुविधा मिळावी यासाठी नाबार्डच्या एफआयएफ निधीतून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी देण्यात आलेल्या दोन मोबाईल एटीएम वाहनाचे उद्घाटन पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी केले. या सुविधेमुळे गरीब आदिवासी बांधवांचा शहरात येण्याचा खर्च वाचेल आणि बँकेच्या माध्यमातून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
११ रुग्णवाहिका व १३ पोलीस वाहनांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:34 PM