लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : तापी नदी शनिवारीही ओसंडून वाहत होती. सकाळी 11 वाजेच्या सुमारास एक जण लाकडाच्या ओंडक्यावर बसून येताना दिसला. ‘वाचवा - वाचवा’ अशी आरडाओरड करीत होता. मात्र बॅरेजजवळ येताच तो अदृश्य झाला.शनिवारी सकाळी 11 ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान लाकडाच्या ओंडक्यावर बसून स्वत:चा जीव वाचवत आरडा-ओरडा करीत अथांग पाण्यातून एक जण पाण्याच्या मधोधम वाहत येत होता. परिसरातील लोकांच्या तो नजरेस पडला. तेव्हा पावसाचाही जोर मोठा होता. याबाबत नागरिकांनी पोलीस व महसूल प्रशासनाला दूरध्वनीद्वारे माहिती देऊन नदीच्या दिशेने धाव घेतली. संगमेश्वरकडून बॅरेजर्पयत त्याला येताना अनेकांनी पाहिले. बॅरेजजवळ त्याला वाचवता येणार नाही म्हणून काही जण प्रकाशा पुलाच्या कठडय़ावर जाऊन उभे राहिले. मात्र ही व्यक्ती बॅरेजजवळ येताच पाण्याचा मोठय़ा प्रवाहात आला आणि स्वत:चा जीव मात्र वाचू शकला नाही. त्या प्रवाहाच्या पुढे लाकडाचा फक्त ओंडका दिसला.
पुरात वाहून येणा:या व्यक्तीचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:42 PM