तळोदा : यंदा दुष्काळी परिस्थिती असताना पालिकेने घरपट्टीत प्रचंड वाढ केली आहे. शिवाय घरपट्टी आकारतानादेखील मोठा दुजाभाव करण्यात आला आहे. त्यामुळे ही वाढीव घरपट्टी कमी करावी यासाठी शुक्रवारी येथील शिवसेनेतर्फे पालिकेच्या अधिका:यांना साकडे घालण्यात आले आहे. याप्रकरणी तातडीने कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.यासंदर्भात सेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिका:यांनी शुक्रवारी पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक विजय सोनवणे यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांना निवेदन देण्यात आले. यंदा संपूर्ण तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशी वस्तुस्थिती असताना येथील नगरपालिकेने नागरिकांच्या मालमत्तांचे पुनमरुल्यांकन केले आहे. तसेच हे मूल्यांकन करताना तब्बल 24 टक्के घरपट्टीत वाढ केली आहे. या मूल्यांकनातही कर्मचा:यांनी अक्षरश: दुजाभाव केला आहे. कारण एक हजार 200 स्क्वेअर फूट असलेल्या घराची घरपट्टी दीड हजार रुपये तर दोन हजार स्क्वेअर फूट असलेल्या घरांची घरपट्टी फक्त एक हजार रुपये आकारण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या या आकारणीबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.शासनाच्या वाढीव मालमत्ता कराबाबत सव्रे करणे आवश्यक होते. तसे न करता पालिकेने सरसकट वाढ करून एकप्रकारे नागरिकांच्या माथी आर्थिक भरुदड लादला आहे. पालिकेने 24 टक्के घरपट्टी वाढविली आहे ती कमी करून दहा टक्के करण्यात यावी. त्याचबरोबर घरपट्टी भरण्याची अल्प मुदत ठेवली. ती वाढवावी अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला़ या वेळी तालुका प्रमुख प्रकाश कुलकर्णी, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, विनोद वंजारी, जगदीश चौधरी, श्रावण तिजबीज, जयेश सूर्यवंशी, काशीनाथ कोळी, इम्रान शेख, विजय मराठे, नितू सोनार, किशोर कुंभार आदी उपस्थित होते.
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर घरपट्टी कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:14 AM