सातपुड्याच्या डोंगराळ भागातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील वाहनधारकांना वाहन चालवणे व नियमांची माहिती मिळावी आणि परवाना मिळावा या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन नंदुरबार कार्यालयातर्फे तालुकास्तरावर शिबिर घेण्यात येत होते. मात्र, हे शिबिर मार्च महिन्यापासून बंद असल्याने सातपुड्याच्या डोंगराळ भागातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील वाहनधारकांना परवाना मिळवण्यासाठी नंदुरबार प्रादेशिक परिवहन कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, ग्रामीण भागातून याठिकाणी चकरा मारत असल्याने गैरसोयीचे व त्रासदायक झाले आहे. तरी तालुकास्तरावर नियमांची माहिती मिळावी आणि परवाना देण्यासाठी शासनाकडून पुन्हा शिबिर सुरू करण्यात यावे. दुर्गम, अतिदुर्गम भागातील वाहनधारकांची परवान्यासाठी होणारी गैरसोय दूर करून, परवाना मिळणे सोयीचे करावे, अशी मागणी आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे
सातपुड्याच्या दुर्गम भागात वाहन परवाना शिबिर पुन्हा सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:26 AM