नंदुरबार,दि.6- तालुक्यातील वडबारे येथे तीन जणांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाली आहे. या तिघांवर नंदुरबार येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ आरोग्य विभागाने गावात केलेल्या सव्रेक्षणात 11 रूग्ण संशयित असल्याचे स्पष्ट झाले आह़े
वडबारे येथे गेल्या आठवडाभरात ग्रामस्थांना तापाची लागण होऊन प्रकृती खालावत असल्याचे स्पष्ट झाले होत़े यानंतर ग्रामस्थांनी या रूग्णांना नंदुरबार शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल केल़े तपासणींअती रूग्णांना डेंग्यू सदृश तापाची लागण झाल्याची माहिती देण्यात आली़ यात मखा ठेलारी, न्हानूभाऊ पेरू ठेलारी या दोघांची प्रकृती गंभीर असून नवनाथ मगन ठेलारी यांची प्रकृती सुधारल्यानंतर रूग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े
गेल्या चार दिवसांपासून गावात फवारणी आणि सव्रेक्षणाला सुरूवात करण्यात आली आह़े या सव्रेक्षणात 11 जणांना तापांची लागण झाल्याची माहिती आली आह़े मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या तापमानवाढीनंतर अचानक खराब झालेल्या वातावरणामुळे तापाची लागण झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आह़े