लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : गरजुंना मदत करणे हीच खरी ईश्वरसेवा असते असे म्हणतात़ याचा प्रत्यय श्रीराम नवमीच्या दिवशी प्रकाशा येथे आला़ या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी भक्तांकडून दानपेटी टाकण्यात आलेली रक्कम प्रकाशा येथील गरजु रुग्ण सुभाष पाडवी यांना देण्यात आली़ प्रकाशा येथे गुप्तेश्वर मंदिरालगत पुरातन काळातील पूर्वमुखी श्रीराम मंदिर आह़े हे गावातील एकमेव मंदिर आह़े या मंदिरात वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात़ श्रीराम नवमीला सकाळपासूनच या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती़ सकाळी 6 ते 9 श्रीराम पंचायतन देवता महापूजा, 10 ते 12 दरम्यान पंचपदी व श्रीराम जन्मोत्सव, सायंकाळी 5 वाजता शांतीपाठ, सायंकाळी 7 वाजता महाआरती आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े प्रकाशा येथे सुभाष पाडवी हे वास्तव्यास आहेत़ दुर्धर आजाराच्या निदानासाठी त्यांना आठवडय़ातून एक वेळा नाशिक येथे जावे लागत असत़े त्यासाठी त्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक खर्च करावा लागत असतो़ त्यामुळे मंदिराचे पूजारी प्रशांत उपासनी यांनी ठरविले की, श्रीराम नवमीला भक्तांकडून दान केलेले पैसे तसेच महाआरतीला जमा होणारे पैसे पाडवी यांना उपचारार्थ देण्यात याव़े यानुसार श्रीराम नवमीनिमित्त सायंकाळी महाआरतीच्या वेळी जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांच्या हस्ते जमलेली रक्कम सुभाष पाडवी यांना देण्यात आली़ या वेळी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष किशोर चौधरी, पुष्पदंतेश्वर संस्थानेचे अध्यक्ष हितेश वाणी, गोवींद पाठक, चंद्रशेखर पाठक, सचिन जोशी, दीपक देशपांडे, किशोर जोशी, महेंद्र लोकाक्षणी, विनोद ढाकणे, धिरज वाणी, राजेंद्र वाणी, विशा पाठक, अश्विनी पाठक, पुष्पा पाटील, रविंद्र चौधरी, संदीप पाटील, उध्दव पाडवी आदी उपस्थित होत़े
दानाच्या रकमेतून होणार गरजु रुग्णावर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:33 AM