लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : सध्या पाणी हे महत्त्वाचे असून त्याचे मूल्य जाणून प्रत्येक गावाने पाण्याचे बजेट तयार केले पाहिजे व त्यानुसार वर्षभर पाण्याचा वापर झाला पाहिज़े असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी यांनी केल़े मोड ता़ तळोदा येथे लोकवर्गणीतून निझरा नदी खोलीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होत़े प्रसंगी तळोदा तहसीलदार योगेश चंद्रे, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, सरपंच जयसिंग माळी, सातपुडा साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर पाटील, जयकिसान सहकारी संघाचे चेअरमन सुभाष रामदास पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक पुरूषोत्तम चव्हाण, भगवान देविदास चौधरी, ग्रामविस्तार अधिकारी शांतीलाल बावा, भीमा गिरधर चौधरी, दगडू गोविंद चौधरी, डॉ़ पुंडलिक राजपूत, काशीनाथ चौधरी, नवल माळी, रणजीत वळवी, ब्रिजलाल चव्हाण, सुरेश चौधरी, वसंत सोनवणे, दिपक पवार, अंबालाल छगन नवले, प्रविणसिंग राजपूत, दिलीप दामू चौधरी, किशोर दगडू पाटील, दिलीप कथ्थू पाटील, दिलीप दगडू पाटील, सुदाम नरोत्तम पाटील, सुरेश सोमजी चौधरी, नरोत्तम गिरधर चौधरी, कोमलसिंग राजपूत, उपस्थित होत़े प्रास्ताविक गुलाबसिंग गिरासे यांनी केल़े प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्या हस्ते निझरा नदी पात्रात खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला़ यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली़ यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात भूजल वाढीची कामे व्हावीत, जलयुक्त शिवाराची कामे लोकांच्या सहभागातून झाली पाहिजेत़ ग्रामस्थांनी जलसाठा करणा:या उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिज़े पाण्याचे महत्त्व आपल्या सर्वाना पटले असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करून ती वापरण्याची प्रक्रिया सर्वानी अमलात आणली पाहिज़े त्यासाठी पाण्याचे बजेट करून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यालयात ते लावावे व त्यानुसार त्याचा वापर करावा़ शेतक:यांसाठी पालकमंत्री पाणंद रस्ता योजनाही शासनाने राबवण्याचा निर्णय घेतला असून त्याचाही शेतक:यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केल़े सरपंच जयसिंग माळी यांनी मोड ग्रामस्थांकडून राबवल्या जाणा:या उपक्रमाची माहिती दिली़
मोड येथे लोकसहभागातून निझरा नदीचे खोलीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:12 PM