शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

खड्डेमय रस्ते असूनही अपघात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:57 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय असूनही अपघात कमी करण्यात प्रशासनाला यश आले असल्याचा दावा उपप्रादेशिक परिवहन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय असूनही अपघात कमी करण्यात प्रशासनाला यश आले असल्याचा दावा उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आला आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ शनिवारी पालिका सभागृहात झाला.जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.डी. बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुधाकर चौरे, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान आदी उपस्थित होते. सुरुवातीस रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतुकीचे नियम व रस्त्यावरील सांकेतिक खुणा दर्शविणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. महेंद्र पंडित यांनी सांगितले, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग यांनी संयुक्तरीत्या काम करावयाचे आहे. दरवर्षी जिल्ह्यात अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दहा टक्के पर्यंत कमी करणे असा उद्देश आपण ठेवला आहे. या अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये जनजागृती करणे वाहतुकीच्या नियमांचे पालन हा आहे. हेल्मेट आपल्या स्वत:च्या सुरक्षेसाठी असतानाही त्याला विरोध होता कामा नये. जिल्ह्यात दरवर्षी दीडशे ते दोनशे लोक अपघातात मृत्युमुखी पडतात तर पाचशे लोक गंभीर जखमी होतात. मृत्युमुखी पडणाºयांची वयोमयार्दा २० ते ५० च्या दरम्यान आहे. सर्वाधिक अपघात दुपारी ३ ते रात्री नऊच्या दरम्यान होतात. रस्त्यावरील नियम पाळण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे. उद्दिष्ठपूर्तीसाठी वाहनांवर कारवाई केली जात नाही शहरात वाहतुकीचा बेशिस्त वाहतूकपणा दिसून येतो. शिस्त लावण्यासाठी ही कारवाई होत असते. असेही त्यांनी सांगितले.प्रास्ताविकात बच्छाव यांनी सांगितले, जिल्ह्यात २०१८ मध्ये ४९९ अपघात झाले होते ते यावर्षी ४१० पर्यंत म्हणजेच १८ टक्क्यांनी कमी झाले आहेत. मागील वर्षी अपघातात मृत्युमुखीची संख्या १७७ होती ती यावर्षी १५२ झाली आहे. त्यातही १४ टक्के घट आली आहे. जखमींची संख्या ३२ टक्क्यांनी कमी झाली आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तर्फे विविध विभाग एकत्ररित्या काम करत असल्याने त्याचा परिणाम अपघात कमी होण्यात दिसून येतो.जिल्ह्यात रस्त्यांची अवस्था ही खड्डेमय असूनही आपण अपघात कमी करू शकलो आहोत. यावेळी चंद्रकांत गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित राजपूत यांनी तर आभार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांनी मानले.