लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे तलाठी कार्यालय गेल्या अनेक वर्षापासून बांधून तयार आह़े परंतु अद्यापही याचा वापर होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आह़े येथील तलाठी परिसरातील कुठल्याही ठिकाणी अस्थाई स्वरुपाचे कामकाज करीत आहेत़ त्यामुळे याचा नाहक मनस्ताप आपली कामे घेऊन आलेल्या ग्रामस्थांना होत आह़े सातपुडय़ातील अतिदुर्गम गाव-पाडय़ातील आदिवासी विद्याथ्र्याना रहिवाशी दाखले, उत्पन्नाचे दाखले, सातबारा आदी विविध कामांसाठी या कार्यालयाचे महत्व अधिक आह़े मात्र आपल्या विविध कामासाठी दुरवरुन पायपीट करुन येणा:या ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आह़े दुर्गम भागातील ग्रामस्थांची सोय व्हावी यासाठी तलाठी व मंडळ कार्यालय एकाच छताखाली असावे या उद्देशाने दोन वर्षापूर्वी मंडळ कार्यालयाच्या वास्तूचे बांधकाम पूर्ण करण्यात आल़े परंतु अद्यापही याचा वापर होत नसल्याने ग्रामस्थांची हेडसांड होत असल्याचा आरोप करण्यात येत आह़े पाडयातून 10 किमीर्पयत पायपीट करुन विद्यार्थी तसेच शेतकरी आपली कामे घेऊन तलाठी कार्यालयात येत असतात़ परंतु तलाठी कार्यालय अस्थाई असल्याने त्यांची दमछाक होत असत़ेकार्यालयाची झाली दुरावस्था.तलाठी कार्यालयाची अत्यंत दुरावस्था झाली आह़े कार्यालय अनेक वर्र्षापासून पडून असल्याने यातील पंखे, लाईट कार्यालयातील इतर साहित्ये खराब झाली आहेत़ तसेच कार्यालयाच्या बाहेर मोठय़ा प्रमाणात झुडपांचे साम्राज्य पसरलेले आह़े रात्रीच्या वेळी या ठिकाणी अप्रिय घटना घडण्याचीही शक्यता व्यक्त होऊ शकत़े त्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्थेचाही यानिमित्ताने निर्माण होऊ शकतो़ लाखो रुपयांचा खर्च करुन बाधलेली ही वास्तू धूळखात पडलेली असल्याने यातून पैशांचा तर अपव्यय होतोच आहे पण सोबत ग्रामस्थांनाही नाहक मनस्ताप होत आह़े
तोरणमाळ येथील तलाठी कार्यालय धुळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 9:20 PM