लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांमध्ये संपर्कासाठी महत्त्वपूर्ण असलेला दूरध्वनी चार महिन्यांपासून बंद आह़े पाचपैकी चार पोलीस ठाणे हे सपाटीवरील असून एक पोलीस ठाणे हे दुर्गम भागातील आह़े पोलीस ठाण्याचा टेलिफोनच बंद असल्याने गुन्हे व अपघातांची माहिती देण्यासाठी नागरिक थेट पोलीस ठाण्यात जात आहेत़ जिल्ह्यात 12 पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आह़े याठिकाणी नागरिकांना संपर्क करता यावा, यासाठी टेलिफोन देण्यात आले आहेत़ वर्षानुवर्षे सुरु असलेले हे टेलिफोन गेल्या वर्षभरापासून सातत्याने बंद पडत असल्याचा प्रकार सुरु आह़े सातपुडय़ाच्या अतीदुर्गम भागात असलेल्या मोलगी पोलीस ठाण्यात जानेवारी 2019 पासून फोन बंद आह़े दूरसंचारची सेवाच नसल्याने येथे इतर कामकाज जुन्याच पद्धतीने सुरु आह़े अती दुर्गम भागात ही स्थिती असतानाच शहादा तालुक्यातील म्हसावद, सारंगखेडा, नवापुर, अक्कलकुवा या तीन ठिकाणचे दूरध्वनी गेल्या चार महिन्यात वेळोवेळी बंद पडत आहेत़ अतीसंवेदनशील भागाचा समावेश या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असतानाही तेथील दूरध्वनी बंद असल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास नागरिकांनी संपर्क करावा तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आह़े शहादा पोलीस ठाण्याचे काही महिन्यांपूर्वी शहराबाहेर दोंडाईचा रोडवर स्थलांतर झाल्याने याठिकाणचा दूरध्वनी दोन महिने बंद होता़ येथील पोलीस अधिका:यांनी पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवडय़ापासून येथील दूरध्वनी सेवा पूर्ववत झाली आह़े हीच स्थिती सध्या नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची असून येथे संपर्क केल्यास केवळ ‘रींग’ वाजत आह़े त्याला प्रतिसादच मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आह़े पोलीस दलाकडून जिल्ह्यातील पोलीस ठाणे ऑनलाईन करण्याची तयारी असताना टेलिफोनसारखी अतीमहत्त्वाची सेवा बंद असताना पोलीस ठाणे डिजीटल होणार कसे असा, प्रश्न आह़े विशेष बाब म्हणजे पोलीस दल प्रशासनाकडून दूरसंचार विभागाकडे बिलांचा भरणा करुनही ही स्थिती निर्माण झाली आह़े
पाच पोलीस ठाण्यांमधील दूरध्वनींची ‘खणखण’ चार महिन्यापासून झाली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:00 PM