शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

डिजीटल इंडियात गांधींचे आता चौथे माकड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 11:11 AM

बुरा मत शेअर करो : तीन माकडांमध्ये मोबाईलधारीची भर

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो’ असे संकेत देणारे गांधींची तीन माकडे सर्वश्रुत आहेत. मात्र सध्या डिजीटल इंडियामुळे सोशल मिडीयाचा वापर वाढल्याने त्यात आता ‘बुरा मत शेअर करो’ असा संकेत देणा:या चौथ्या माकडाचीही भर पडली आहे. नुकतीच गांधी जयंती देशभरात उत्साहात साजरी झाली. त्यातूनच ही नवी कल्पना आता उदयास येत आहे.1933 साली महात्मा गांधींच्या सत्याग्रह आश्रमात जपानचे गुरुजी फ्यूजी हे आले होते. त्यांनीच त्यावेळी गांधीजींना तीन माकडांची प्रतिकृती भेट दिली होती. ही तीन माकडे पुढे गांधीजींच्या नित्याच्या प्रार्थनेत समाविष्ट झाली आणि त्याचा बोध समाजापुढे मांडला गेला. डोळ्यावर पट्टी बांधलेले माकड म्हणजे समाजातील वाईट पाहू नका, कानावर हात ठेवलेले माकड म्हणजे समाजातील वाईट गोष्टी ऐकू नका आणि तोंडावर हात ठेवलेले माकड म्हणजे कोणाला वाईट बोलू नका. ही तीन माकडे त्याकाळी खूप प्रसिद्ध झाली. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही या तीन माकडांच्या प्रतिकृती अनेक ठिकाणी समाजाला बोध देण्यासाठी वापरली जात आहेत. काही शहरांमध्ये त्याचे चौकात स्टेच्यूही लावले आहेत. नंदुरबार शहरातही पालिकेने महात्मा गांधींच्या अर्धकृती पुतळ्याजवळ या तीन माकडांचे पुतळे लावले आहेत.गांधींनी जो संदेश या माकडांच्या माध्यमातून दिला त्याचा उलट संदेश मध्यंतरी शासनाच्या लाचप्रतिबंधक विभागाने दिला होता. त्यात जे वाईट पाहिले ते बोला,              ते ऐका आणि उघडय़ा डोळ्याने पाहून लाच           प्रतिबंधक विभागाला कळवा, असा त्याचा आशय होता. त्यासाठी त्यांनी गांधींच्या या तीन माकडांचा वापर केला होता.आता सध्या डिजीटल युग आल्याने मोबाईलचा वापर मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला आहे. हा अतिरेक प्रशासन आणि समाजालाही डोकेदुखी ठरत आहे. अनेक जण सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हॉटस्अप, फेसबुक, टि¦टर, इन्स्टाग्रामद्वारे वाईट मेसेसेज किंवा चित्र पाठवून सामाजिक शांतता बिघडवत आहेत. त्यातून अनेक गुन्हेही घडत आहेत. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. मुलांच्या आत्महत्या होत आहेत, अशा किती तरी घटना रोज केवळ सोशल मिडीयातील वाईट शेअरींगमुळे होत आहेत. हे टाळण्यासाठी व समाजाला त्या माध्यमातून बोध देण्यासाठी आता ‘मोबाईलवर वाईट शेअर करू नका’ असे सांगणा:या चौथ्या माकडाची जोड देण्यात आली आहे. गांधी जयंतीच्या दिवशी सोशल मिडीयावर ही पोस्ट मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाली. त्यामुळे अनेकांना ती संकल्पना पटलीही. समाज व प्रशासनाला जागृतीसाठी हे माकड निश्चितच उपयोगी पडणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे गांधींचे ‘मोबाईलवर वाईट शेअर करू नका’ असे दर्शविणारे चौथे माकड सध्या चांगल्याच चर्चेत आले आहे.