लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुसुचित जमाती जात पडताळणी समितीकडून दर दिवशी केवळ 60 विद्याथ्र्याच्या प्रकरणांवर चर्चा सुरु आह़े बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेणा:या सीईटी-सेलकडून समितीकडे दरदिवशी परीक्षा पास झालेल्या विद्याथ्र्याच्या याद्या पाठवून कामकाज सुरु आह़े धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातून आतार्पयत सरासरी 45 हजार अनुसुचित जमातीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नंदुरबार येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज दाखल केले आहेत़ या अर्जावर तातडीने कामकाज करण्याचे आदेश शासनाकडून सातत्याने देण्यात येतात़ दरम्यान यंदा बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनुसुचित जमातीच्या 12 हजारपेक्षा अधिक विद्याथ्र्यानी समितीकडे अर्ज केल्याची माहिती आह़े मोठय़ा संख्येने प्राप्त झालेल्या प्रस्तावांना निकाली काढण्यासाठी राज्यशासनाने जात पडताळणी समित्यांना 30 जूनर्पयत विशेष मोहिम राबवून प्रकरणे निकाली काढण्याचे सुचवले होत़े यानुसार नंदुरबार येथील समितीकडून कामकाज सुरु असले तरी त्या कामांना गती मिळत नसल्याने विद्याशाखांच्या प्रवेशास पात्र असलेल्या विद्याथ्र्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आह़े विशेष मोहिमेंतर्गत वैधता प्रमाणपत्र मिळालेल्या विद्याथ्र्याची संख्या समोर आली नसली तरी ही संख्या 1 हजाराच्या आत असल्याची माहिती आह़े यामुळे मोहिमेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आह़े
वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थी त्या-त्या विद्याशाखेच्या प्रवेशाला पात्र झाल्यानंतर सीईटी-सेलकडून त्यांच्या जातप्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे समितीला सुचवण्यात येत़े यासाठी दरदिवशी अनुसुचित जमातीच्या विद्याथ्र्याच्या याद्या समितीकडे देण्यात येत आहेत़ यानुसार दर दिवशी 60 किंवा त्यापेक्षा कमीच विद्याथ्र्याच्या प्रकरणांवर चर्चा होत आह़े समितीकडे पडताळणीसाठी पोलीस दलातील एका अधिका:याची नियुक्ती करण्यात येत़े परंतू पोलीस निरीक्षकाचे हे पदही रिक्त असल्याने अडचणी आल्याचे सांगण्यात आले आह़े गेल्या वर्षभरात दाखल करण्यात आलेल्या 45 हजारपेक्षा अधिक प्रकरणांपैकी समितीने 11 हजार 900 प्रकरणे निकाली काढल्याची माहिती देण्यात आली आह़े सर्वात गंभीर प्रश्न असलेल्या विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत नेमक्या किती विद्याथ्र्याचे प्रस्ताव निकाली काढून त्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले याची अंतिम आकडेवारी 1 जुलै रोजी समोर येणार आह़े तोवर शासनाकडून येणा:या सीईटी सेल आणि शासनाकडून देण्यात येणा:या विद्याथ्र्याच्या याद्यांवर कामकाज सुरु राहणार आह़े