n लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नोकरीला लागताना कायद्याने शपथ घेऊन अंगावर गणवेश परिधान केला जातो. म्हणून पोलिसांच्या वर्दीकडे सन्मानाने बघितले जाते. मात्र कोंडाईबारी घाटात ड्युटी बजावणारा अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.झाले असे की, सुरत-नागपूर या महामार्गाचे काम गेली अनेक महिने सुरू आहे. कामात दिरंगाई होत असल्याने रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था होऊन वाहन चालकांची प्रचंड गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वीच या घाटात कार व ट्रॅव्हल्स 30 फूट दरीत पडून आठ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर याठिकाणी भेट दिली असता तिथे भलतेच दृष्य पहावयास मिळाले. ऑन ड्युटी असणारा पोलीस कर्मचारी अक्षरशः अर्धनग्न अवस्थेत महामार्ग ओलांडून उघड्यावर शौचास जाताना दिसून आले. अंगात पांढरा वाहतूक शाखेचा पोलिसी शर्ट, पायात बूट परंतु या महाशयांनी पॅन्ट घातलेलीच नव्हती. याचवेळी या रस्त्याने जाणाऱ्या महिला प्रवाशांनी शरमेने मान फिरविल्या. परंतु याचे या महाशयास काहीच वाटत नव्हते. आम्ही त्यांना हटकले, हा वर्दीचा अपमान असल्याचे सांगितले तर ते उलट शिरजोरी करू लागले. ‘मला मूळव्याधचा त्रास आहे. जाणे अर्जंट होते म्हणून घाईघाईने निघालो’ असे सांगून गेले. संपूर्ण प्रकार पाहून महामार्गावरून गुजरात राज्यातील एका प्रवासी महिलेने सांगितले की, महाराष्ट्र पोलिसांचे काम चांगले आहे. महामार्गावर अर्धनग्न अवस्थेत येणे नक्की सामाजिकदृष्ट्या अशोभनीय कृत्य आहे. अर्थात कोंडाईबारी घाटातील पोलीस चौकी नेहमीच या-ना-त्या कारणाने चर्चेत असते. याठिकाणी ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारीही आहेत. कर्मचारी असे का वागतात? त्यांना कोणाचे पाठबळ आहे? वाहन चालकांकडून काही पोलीस कर्मचारी सरळ सरळ पैसे उकळत असल्याच्या तक्रारी आहेत. खरे तर याकडे पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस वाहन चालकांनी मास्क घातले आहे की नाही याची तपासणी करतात. मास्क घातला नसेल तर मास्क घालण्याची सूचना करून प्रामाणिकपणे ड्युटी करतात. परंतु कोंडाईबारी घाटातील महामार्गाचे पोलीस मदत केंद्रावरील पोलीस कर्मचारी अर्धनग्न अवस्थेत दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा संपूर्ण प्रकार लांच्छनास्पद होता.
पोलीस चौकीत शौचालय नसल्याने उघड्यावर शौचालय१९ नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस म्हणून नुकताच साजरा करण्यात आला. परंतु कोंडाईबारी घाटातील विसरवाडी राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा पथकाच्या चौकीत शौचालय नसल्याने पोलीस कर्मचारी उघड्यावर शौच करण्यासाठी जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून ते ग्रामीण भागातील ग्रामसेवकापर्यंत हागणदरीमुक्त करण्यासाठी जनजागृती केली जाते. उघड्यावर शौचास जाऊन नये, यातून रोगराई पसरते. तरीदेखील कोरोनासारख्या भीषण महामारीत पोलीस चौकीत शौचालय नसल्याने २४ तास सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना उघड्यावर शौच करणे आरोग्याच्यादृष्टीने नक्कीच धोकेदायक आहे.पोलीस चौकीत शौचालय नसल्याने उघड्यावर शौचालय१९ नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस म्हणून नुकताच साजरा करण्यात आला. परंतु कोंडाईबारी घाटातील विसरवाडी राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा पथकाच्या चौकीत शौचालय नसल्याने पोलीस कर्मचारी उघड्यावर शौच करण्यासाठी जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून ते ग्रामीण भागातील ग्रामसेवकापर्यंत हागणदरीमुक्त करण्यासाठी जनजागृती केली जाते. उघड्यावर शौचास जाऊन नये, यातून रोगराई पसरते. तरीदेखील कोरोनासारख्या भीषण महामारीत पोलीस चौकीत शौचालय नसल्याने २४ तास सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना उघड्यावर शौच करणे आरोग्याच्यादृष्टीने नक्कीच धोकेदायक आहे.