शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

व्यापा-यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा : नवापूर बाजार समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 8:49 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अधिकारी व अनुज्ञप्तीधारक व्यापा:यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बाजार समिती आवारात शेतमाल खरेदी विक्री करण्यात यावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुरूपसिंग नाईक, जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी, तहसीलदार प्रमोद वसावे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, नायब तहसीलदार राजेंद्र नजन, बाजार समितीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अधिकारी व अनुज्ञप्तीधारक व्यापा:यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बाजार समिती आवारात शेतमाल खरेदी विक्री करण्यात यावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुरूपसिंग नाईक, जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी, तहसीलदार प्रमोद वसावे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, नायब तहसीलदार राजेंद्र नजन, बाजार समितीचे चेअरमन मधुकर नाईक, संचालक गिरीश गावीत, सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी व रणजित पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. बाजार समितीच्या नवापूर, विसरवाडी व खांडबारा कार्यक्षेत्रात व्यापार करणारे व्यापारी बैठकीस उपस्थित होते.  शासनाने बाजार समिती आवारातच शेतमाल खरेदी विक्री करावी अश्या सूचना केल्या आहेत. नवापूर तालुक्यात ही खरेदी विक्री बाजार समिती आवारातच व्हावी. यासाठी  व्यापा:यांना काही अडचणी व समस्या असल्यास त्या जाणून घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. व्यापा:यांचे प्रतिनिधी म्हणून गुलाम व्होरा यांनी व्यापा:यांसाठी बाजार समिती आवारात खरेदी केलेला शेतमाल साठवणुकीची सोय नाही. बाजार समितीने व्यापा:यांना धान्य साठवणुकीची सोय उपलब्ध करून द्यावी व सोय उपलब्ध होईस्तोवर व्यापा:यांना आहे त्या ठिकाणी          व्यापार करु द्यावा, अशी भूमिका मांडली.  बाजार समितीत शेतमालाची खरेदी विक्री होत नसल्याने बाजार समितीचे उत्पन्न बुडत आहे. दुसरीकडे शेतक:याला शासनाच्या सोयी सवलतींचा लाभ देता येत नसल्याचे सचिव अमोल पिंपळे यांनी         सांगितले. शासन आदेशाचे पालन करून बाजार समितीस सहकार्य करण्याची भूमिका  व्यापा:यांनी घ्यावी, असे जिल्हा उपनिबंधक पूरी यांनी सांगितले. बाजार समितीच्या उत्पन्नाचे स्नेत कमी असल्याने तात्पुरती सोय उभारून व्यापा:यांसाठी धान्य साठवणुकीसाठी प्रय} करण्यात येतील. प्रथमच आदिवासी विकास विभागाकडून कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बळकटी आणण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळांतर्गत भरीव तरतूद करण्यात आल्या आहेत. सुमारे तीन कोटी रुपये नंदुरबार जिल्ह्यास प्राप्त झाले असून त्या माध्यमातून नवापूर बाजार समितीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रय} होइल असे त्यांनी स्पष्ट केले. शासन नियमानुसार मात्र बाजार समिती आवारातच शेतमाल खरेदी विक्री करण्यात यावी यावर जिल्हा उपनिबंधक ठाम राहिलेत.  आमदार नाईक म्हणाले की, शेतक:यांचे नुकसान व्हायला नको व व्यापारी बांधवासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने नवापूर बाजार समिती आवारासाठी दोन कोटी खर्चाचे प्रस्ताव जिल्हा नियोजन विकास मंडळात सादर केल्याचे सांगितले. नवापूरची वस्तुनिष्ठ परिस्थिती पाहता मध्यम मार्ग काढण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी नवापूर बाजार समितीकडून राबविण्यात आलेल्या कृषी पणन महासंघाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेच्या लाभाथ्र्याना वाटप केलेल्या कर्जाचे प्रमाणपत्र पूरी व आमदार नाईक यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.