मोड परिसरात हरभरा पिकावर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:58 AM
शेतक:यांकडून बुरशीनाशकांची फवारणी
लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील मोहिदा, कळमसरे, मोड परिसरात हरभरा पिकावर ‘मर’ रोगाचा प्रादरुभाव झाला आह़े त्यामुळे शेतक:यांकडून कृषी विभागाच्या मार्गदर्शनानूसार बुरशीनाशकाची फवारणी करण्यात येत आह़े परिसरात मोठय़ा प्रमाणात गारठा वाढत आह़े त्यामुळे शेतक:यांकडूनही हरभरा पिकांची पेरणी करण्यात आली आह़े परंतु त्यानंतर बुरशीमुळे ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने यातून शेतक:यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, काही शेतक:यांकडून रोगाचा प्रादुर्भाव झालेली रोपटी उपटून टाकण्यात येत आह़े तर काहींकडून त्यावर बुरशीनाशकाची फवारणी करण्यात येत आह़े दरम्यान तळोदा तालुक्यात हरभरा हे पिक रब्बी हंगामात हमखास उत्पन्न देणारे ठरत आह़े त्यामुळे येथील शेतक:यांकडून या दिवसांमध्ये हरभरा पिकाची मोठय़ा प्रमाणात पेरणी करण्यात येत असत़े परंतु अशा प्रकारे बुरशीजन्य रोगाची लागन होत असल्याने शेतक:यांकडूनही चिंता व्यक्त होत आह़े