कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक आंबालाल चौधरी होते.
नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग व पाडळदा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. एक ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण व दर्जा उंचावणे हा उद्देश आहे. क्रीडा शिक्षक चतुर पाटील यांनी गोळ्यांचे सेवन कशा प्रकारे करावे, गोळी चावून खावी व नंतर पाणी प्यावे. आजारी मुलांना गोळ्या पूर्ण बरे झाल्यावर देणे तसेच गोळ्या घेतल्यावर काही त्रास झाल्यास काय करावे, याविषयी मार्गदर्शन करुन स्वच्छतेचे महत्त्व पटवनू दिले. जंतनाशक गोळी पूर्णत: सुरक्षित आहे म्हणून वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गोळ्या देण्यात आल्या. कार्यक्रमास मुख्याध्यापक विजय पाटील, पर्यवेक्षक अंबालाल चौधरी, विश्राम पाटील, धर्मेंद्र कुवर, राजू वसावे, गोपाल विसावे, दिव्या चौधरी व विनोद गोसावी उपस्थित होते.