लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापूर तालुक्यातील 365 शाळांमधील 52 हजार 57 विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले होते. दरम्यान, शहरातील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये विद्याथ्र्याना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करून जंतनिमरूलन औषधोपचार करण्यात आले.विद्यार्थाचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी आरोग्य विभागातर्फे ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्राचार्य विनोदकुमार पाटील, उपमुख्याध्यापक भरत पाटील, उपप्राचार्य एस.आर. पहूरकर, पर्यवेक्षक हरीश पाटील, पर्यवेक्षिका कमल कोकणी यांच्या हस्ते विद्यार्थाना जंतनाशक गोळी देऊन शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात समुपदेशक कैलास माळी यांनी विद्याथ्र्याना मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश मावची, डॉ.मनीडा वळवी, डॉ.अमोल जाधव, प्रीती गावीत व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक हेमंत पाटील यांनी तर संग्रामसिंग राजपूत यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी आरोग्य कर्मचा:यांसह शिक्षक व कर्मचा:यांनी परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जंतनाशक गोळ्या वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. ऑगस्टपर्यत ही मोहीम चालणार आहे. जंतनाशक गोळी चॉकलेट स्वादात असून ती चघळून व चावूनही घेता येते. दुस:या टप्प्पातही ही गोळी देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणा:या या मोहिमेत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश मावची यांनी शहर व तालुक्यातील अंगणवाडी, शहरी व ग्रामीण शाळा व महाविद्यालय येथे जाऊन गोळ्या वाटपाचे नियोजन केले होते.
365 शाळांमध्ये जंतनाशक गोळ्या वाटप : नवापूर तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:05 PM