लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मकरसंक्रातीनिमित्त जिल्ह्यात पतंगोत्सवाची धूम असते़ यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजावर प्रशासनाने बंद घातली असून यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी आदेश काढले आहेत़प्लास्टिकचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या नायलॉन मांजामुळे जिवितहानी होण्याच्या घटना घडल्या असल्याने संरक्षणची गरज असल्याने जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी पर्यावरण (संरक्षण) अधिनियमांतर्गत नायलॉन मांजाच्या विक्रीवर प्रतिबंध घातला आहे़घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, तसेच साठवणुकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवण्याचे आदेशात म्हटले आहे़ मांजा विक्री झाल्यास कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहे़पतंग उडवितांना माजांच्या वापरामुळे वीज तारांवर घर्षण होऊन आग लागून अपघात घडण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे़
जिल्हा प्रशासनाकडून नायलॉन मांजावर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:30 PM